हॉकीत भारताच्या पोरींनी रचला इतिहास! प्रथमच आशिया चषक उंचावला, खेळाडूंना बक्षीसही जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 05:55 PM2023-06-11T17:55:03+5:302023-06-11T17:55:26+5:30
India win the 2023 Women's Hockey Junior Asia Cup : क्रिकेटमध्ये भारताचा पराभव झाला असली तरी हॉकीमध्ये भारताच्या पोरींनी सोनेरी यश मिळवले.
Women's Junior Hockey Asia Cup । नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून अजिंक्यपद पटकावले. खरं तर क्रिकेटमध्ये भारताचा पराभव झाला असला तरी हॉकीमध्ये भारताच्या पोरींनी सोनेरी यश मिळवले. हॉकी महिला ज्युनिअर आशिया चषक स्पर्धेत भारताने इतिहास रचला असून प्रथमच जेतेपद पटकावले आहे.
दरम्यान, भारताच्या ज्युनिअर महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताने प्रथमच हॉकी महिला ज्युनिअर आशिया चषकाच्या स्पर्धेवर नाव कोरले आहे. अंतिम फेरीत टीम इंडियासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान होते. भारताने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असलेल्या दक्षिण कोरियाचा २-१ असा पराभव केला. दक्षिण कोरियाने सर्वाधिक ४ वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा २०२१ मध्येच होणार होती पण कोरोनामुळे ती दोन वर्षांच्या विलंबाने खेळवली गेली.
India win the 2023 Women's Hockey Junior Asia Cup, beat South Korea 2-1, in Japan
— ANI (@ANI) June 11, 2023
Hockey India announces the players will receive a cash prize of Rs 2 lakhs each and support staff will receive a cash prize of Rs 1 lakh each for clinching their maiden Women's Junior Asia Cup 2023… pic.twitter.com/INBYP8XI8t
भारताच्या पोरींनी रचला इतिहास
भारताच्या महिला हॉकी ज्युनिअर संघाने दक्षिण कोरियाचा पराभव करून ही किमया साधली. जपानमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या विजयाचा मान भारतीय महिलांना मिळाला. विजयानंतर हॉकी इंडियाने घोषित केले की, खेळाडूंना प्रत्येकी २ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल. तसेच सहाय्यक कर्मचार्यांना महिला ज्युनिअर आशिया चषक २०२३ चे विजेतेपद जिंकल्यामुळे प्रत्येकी १ लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळेल.
Such historic achievements deserves a great reward 😍
— Hockey India (@TheHockeyIndia) June 11, 2023
Hockey India announces the Players will receive a cash prize of Rs. 2 lakhs each and Support Staff will receive a cash prize of Rs.1 lakh each for clinching their maiden Women's Junior Asia Cup 2023 Title.#HockeyIndia… pic.twitter.com/yTkB2oq2Jq