अलविरो पीटरसनवर मॅचफिक्सिंगचे आरोप निश्चित
By admin | Published: November 14, 2016 01:51 AM2016-11-14T01:51:14+5:302016-11-14T01:51:14+5:30
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अलविरो पीटरसनला मॅचफिक्सिंग प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने केलेल्या चौकशीनंतर अलविरोसह
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू अलविरो पीटरसनला मॅचफिक्सिंग प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने केलेल्या चौकशीनंतर अलविरोसह अन्य काही खेळाडूंनाही या प्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. मंडळाने अलविरोला उत्तर देण्यासाठी चौदा दिवसांचा वेळ दिला आहे.
२०१५ मध्ये झालेल्या रॅम स्लॅम टी-२० मालिकेतील अनेक सामने निश्चित करण्यात पीटरसनचा हात असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. फिरकी गोलंदाज गुलाम बोडी याने चौकशी दरम्यान आरोप स्वीकारल्यामुळे त्याच्यावर २० वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. यष्टीरक्षक थामी त्सोल्किले याच्यावर १२ वर्षांची बंदी घालण्यात आली, तर पुमेलेला मत्शिकवे, इथी मभलाती, योन शिमेंस यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.(वृत्तसंस्था)