अमरहिंदची अंतिम फेरीत धडक

By admin | Published: October 31, 2016 04:13 AM2016-10-31T04:13:40+5:302016-10-31T04:13:40+5:30

गोल्फादेवी प्रतिष्ठान संघाचा ५२-५० असा चुरशीचा पराभव करुन मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद किशोरी गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Amarnath hit the final round | अमरहिंदची अंतिम फेरीत धडक

अमरहिंदची अंतिम फेरीत धडक

Next


मुंबई : मध्यांतरानंतर आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत दादरच्या अमर हिंद मंडळ संघाने गोल्फादेवी प्रतिष्ठान संघाचा ५२-५० असा चुरशीचा पराभव करुन मुंबई शहर जिल्हा अजिंक्यपद किशोरी गट कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अन्य सामन्यात शिवशक्ती महिला संघाने ओम कबड्डी संघावर ४२-२९ अशी मात करत अंतिम फेरी गाठली.
मुंबई शहर कबड्डी संघटनेच्या वतीने वडाळा येथील भारतीय क्रीडा मंडळाच्या मैदानात सुरु असलेल्या या स्पर्धेच्याउपांत्य फेरीत गोल्फादेवी संघाच्या साक्षी जंगम आणि अस्मिता जंगम यांनी शानदार खेळ करत मध्यांतराला २७-२० अशी आघाडी घेतली. विश्रांतीनंतर मात्र, अमरहिंदच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. अमरहिंदच्या साक्षी माचीवले आणि वेल्सिका नाडार यांनी तुफानी खेळ करत गोल्फादेवी संघाला कडवी झुंज दिली. मध्यांतरांनतर झालेल्या लक्षवेधी खेळात अमरहिंदने ५२-२० अशा अवघ्या दोन गुणांनी थरारक बाजी मारली.
अन्य सामन्यात शिवशक्ती महिला संघाने ओम कबड्डी संघावर ४२-२९ असा सहज विजय मिळवला. अक्षता पाटील आणि ज्योती डफळे यांच्या निर्णायक खेळाच्या जोरावर शिवशक्ती संघाने अंतिम फेरी गाठली. ओम संघाच्या योगिता सकपाळ व प्रीती होदे यांनी अपयशी झुंज दिली.
द्वितीय श्रेणी व्यावसायिक पुरुष गटात मध्य रेल्वे-माटुंगा, मुंबई अग्निशमन दल, सचिवालय जिमखाना, माझगाव डॉक आदी संघांनी विजयी कूच केली. मध्य रेल्वे विरुद्ध सिद्धिविनायक मंदिर न्यास कबड्डी सामन्यात सिद्धिविनायक संघाने मध्यांतराला १८-१० अशी आघाडी घेतली.
मात्र मध्यांतरानंतर रेल्वेच्या सुरज दुधाणे व भुषण राऊत यांनी आक्रमक खेळ करत सिद्धिविनायक संघावर २७-२५ अशी मात केली. मुंबई अग्निशमन दलाने आयुर्विमा महामंडळाला २१-९ आणि माझगाव डॉक कबड्डी संघाने ओरिएन्टल इन्शुरन्स संघाला ३९-२९ असे नमवले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Amarnath hit the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.