ंमराठा वॉरियर्स, अथर्व यांच्यात चुरस

By Admin | Published: December 25, 2016 10:42 PM2016-12-25T22:42:29+5:302016-12-27T01:13:34+5:30

नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धेत मराठा वॉरियर्स विरुद्ध अथर्व रॉयल्स यांच्यात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला. अथर्व संघाचा कर्णधार वैभव केंदळे याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मराठा वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत १७९ धावा करून अथर्व संघासमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले. अथर्वच्या फलंदाजांनीही मैदानावर येऊन तुफान फटकेबाजीला प्रारंभ केल्याने या सामन्यात चुरस निर्माण झाली.

Ambassador Warriors, Atharva | ंमराठा वॉरियर्स, अथर्व यांच्यात चुरस

ंमराठा वॉरियर्स, अथर्व यांच्यात चुरस

googlenewsNext

नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल क्रिकेट स्पर्धेत मराठा वॉरियर्स विरुद्ध अथर्व रॉयल्स यांच्यात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर रविवारी सायंकाळी प्रारंभ झाला. अथर्व संघाचा कर्णधार वैभव केंदळे याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मराठा वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत १७९ धावा करून अथर्व संघासमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले. अथर्वच्या फलंदाजांनीही मैदानावर येऊन तुफान फटकेबाजीला प्रारंभ केल्याने या सामन्यात चुरस निर्माण झाली.
हा सामना बघण्यासाठी गतवर्षीच्या एसव्हीसी रॉयल्स संघाचे मालक रवि पगारे, श्रीकांत नागरे, सौ. नागरे, प्रमोद गोरे, अथर्व गोरे, राजुरी स्टीलतर्फे संतोष निफाडे, सुरेंद्र पटेल, हेमंत कोठावदे, शंकर मित्तल, विजय जाधव, प्रदीप भदाणे, प्रदीप कोठावदे, हेमंत कोठावदे आदि उपस्थित होते.

Web Title: Ambassador Warriors, Atharva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.