अमेरिकेची मेडिसन कीज ठरली 'ऑस्ट्रेलियन ओपन' विजेती! मिळालं तब्बल XX कोटींचे बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 09:28 IST2025-01-26T09:28:12+5:302025-01-26T09:28:27+5:30
Madison Keys, Australian Open price money : कीजने कडवी झुंज देत गतविजेत्या सबालेंकावर ६-३, २-६, ७-५ असा विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरले.

अमेरिकेची मेडिसन कीज ठरली 'ऑस्ट्रेलियन ओपन' विजेती! मिळालं तब्बल XX कोटींचे बक्षीस
Madison Keys wins Australian Open price money : अमेरिकेच्या मेडिसन कीजने अव्वल मानांकित बेलारूसची आर्यना सबालेंकाला पराभूत करत शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनटेनिसचा पहिला किताब जिंकला. सलग दोनवेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या सबालेंकाने यंदा तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली हेती. पण मेडिसन कीजने तिला जेतेपदाच्या हॅट्रिकपासून वंचित ठेवले. कीजने कडवी झुंज देत गतविजेत्या सबालेंकावर ६-३, २-६, ७-५ असा विजय मिळवून ऑस्ट्रेलियन ओपनवर नाव कोरले.
The best of an AMAZING women's final! 🤩#AusOpen • #AO2025pic.twitter.com/yiVuTIlD7n
— #AusOpen (@AustralianOpen) January 26, 2025
अंतिम सामन्यातील पहिल्या सेटमध्ये सुरुवातीपासून २९ वर्षाच्या कीजने वर्चस्व गाजवले. तिने पहिल्या सेटमध्ये सहा गेम्स जिंकले व ६-३ ने विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये सबालेंकाने पुनरागमन केले व कीजचा ६-२ ने पराभव करून बरोबरी साधली. तिसऱ्या सेटमध्ये चुरशीचा सामना झाला. कीजने अंतिम गेम ७-५ असा जिंकून नवी विजेती होण्याचा मान मिळविला.
Looking good, champion 🏆 @Madison_Keyspic.twitter.com/tGEdQVboh2
— #AusOpen (@AustralianOpen) January 26, 2025
मेडिसन कीजने जिंकली मोठ्ठी रक्कम
ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या महिला एकेरीची अंतिम फेरी जिंकल्यानंतर मेडिसन कीज कोट्यवधींच्या बक्षिसाची मानकरी ठरली. यावेळी विजेत्याला ३५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १९ कोटी रुपयांचे इनाम देण्यात आले.