अंतिम फेरीत धडक मारण्याचे अमेरिकेचे लक्ष्य
By admin | Published: June 21, 2016 02:05 AM2016-06-21T02:05:56+5:302016-06-21T02:05:56+5:30
जुर्गेन क्लिंसमन याच्या अमेरिकन संघाचे लक्ष्य असणार आहे, ते मंगळवारी सेमीफायनलमध्ये लियोनल मेस्सी याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघावर मात करीत कोपा
ह्यूस्टन : जुर्गेन क्लिंसमन याच्या अमेरिकन संघाचे लक्ष्य असणार आहे, ते मंगळवारी सेमीफायनलमध्ये लियोनल मेस्सी याच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघावर मात करीत कोपा अमेरिका सेंटेनारियो फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरी गाठणे.
क्लिंसमन याने याआधीच उपांत्य फेरी गाठण्याचे लक्ष्य पूर्ण केले आहे. संघाने शानदार कामगिरी करताना उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि तेथे त्यांनी जबरदस्त फार्मात असणाऱ्या इक्वाडोर संघाला नमवले. तथापि, येथील एनआरजी स्टेडियममध्ये अर्जेंटिनाविरुद्ध क्लिंसमन याच्या संघाचा मार्ग तेवढा सोपा असणार नाही.
अमेरिकेने नुकत्याच झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात चांगली कामगिरी कली. त्यामुळे क्लिंसमनला उपांत्य फेरीत विजय मिळवण्याची आशा आहे. जर्मनीच्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचा सदस्य राहिलेल्या क्लिंसमन याने आम्ही कोपा अमेरिका जिंकू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. तो म्हणाला, की गेल्या काही वर्षांत संघर्षपूर्ण सामन्यासाठी आम्ही युरोप आणि मेक्सिकोचे दौरे केले आणि विजय मिळवण्यात यशस्वी ठरलो.’’
दुसरीकडे अर्जेंटिनाने आतापर्यंत चार सामन्यांत १४ गोल केले आहेत आणि त्यांना रोखणे सोपे नाही. मेस्सीने उपांत्यपूर्व फेरीत वेनेजुएलाविरुद्ध गोल केला. ज्यामुळे संघ ४-१ असा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला.
मेस्सीने प्रतिस्पर्धी संघाला इशारा देताना म्हटले, ‘‘आम्ही योग्य मार्गपथावर आहोत; परंतु अमेरिकेच्या प्रेक्षकांसमोर खेळणे खूप कठीण आहे. शारीरिक रूपाने आमचा संघ खूप तुल्यबळ आहे आणि आम्हाला संधी मिळाल्यास आम्ही प्रतिस्पर्धी संघाला खूप हानी पोहोचवू शकतो.’’