अमित, शिवा थापाची आशियाई स्पर्धेसाठी निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 02:24 AM2019-03-21T02:24:05+5:302019-03-21T09:05:00+5:30
आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता अमित पंघाल(५२ किलो)याच्यासह अनुभवी शिवा थापा(६० किलो) यांची पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे.
नवी दिल्ली -आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्णविजेता अमित पंघाल(५२ किलो)याच्यासह अनुभवी शिवा थापा(६० किलो) यांची पुढील
महिन्यात होणाऱ्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपसाठी निवड करण्यात आली आहे. स्पर्धेचे आयोजन बकाँक येथे १९ ते २८ एप्रिल या कालावधीत होईल.
अमित प्रथमच आशियाई चॅम्पियनशिपमध्ये उतरणार असून शिवाला सलग चौथे पदक जिंकण्याची संधी असेल. पंघालने मागच्या महिन्यात बल्गेरियात झालेल्या स्ट्रांजा मेमोरियल स्पर्धेच्या ४९ किलो गटात सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर मात्र जर्मनीत झालेल्या या स्पर्धेत तो नव्या वजनगटातसहभागी झाला होता. २०२० टोकियो आॅलिम्पिकमध्ये ४९ किलो हा गट राहणार नसल्याने अमित वरच्या वजन गटात सहभागी होईल.
भारताचा आघाडीचा बॉक्सर शिवा थापाने फिनलॅन्डमधील जीबी स्पर्धेत सुवर्ण जिंकून नव्या सत्राचा यशस्वी शुभारंभ केला. विश्वचषकाचा कांस्य विजेता असलेल्या शिवाने २०१३ च्या आशियाई चॅम्पियनशिपचे सुवर्ण, २०१५ मध्ये कांस्य आणि २०१७ मध्ये राप्ै य जिकं ल े आहे. आशियाइर् स्पर्धेत त्याने सातत्याने यश मिळवले आहे.
राष्टÑीय कोच सी.ए. कटप्पा म्हणाले, ‘आशियाई चॅम्पियनशिपच्या आॅलिम्पिक वजन गटात सुवर्ण आणि रौप्य जिंकणाऱ्या बॉक्सर्सना या वर्षाअखेर होणाºया विश्व चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधीदिली जाईल.’ राष्टÑीय चॅम्पियन दीपक सिंग ४९ किलो गटात लढत देईल. त्याने इराणमधील माकरान येथे झालेल्या स्पर्धेत नुकतेच सुवर्णपदक जिंकले होते.
महिला गटात एम.सी. मेरीकोम ही विश्व चॅम्पियनशिप तसेच आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेवर लक्ष कें दित््र ा करीत असल्यान े या स्पर्धत्े ाखेळणार नाही.
भारतीयबॉक्सिंग संघ
दीपक (४९ किलो), अमित पंघाल
(५२ किलो), कविंदरसिंग बिश्त
(५६ किलो), शिवा थापा (६०
किलो), रोहित टोकस (६४ किलो),
आशिष (६९ किलो), आशिष
कुमार (७५ किलो) , बृजेश यादव
(८१ किलो), नमन तंवर (९१
किलो), सतीश कुमार (९१
किलोच्या वर).