अमिताभ बच्चन यांनी केलं विराट कोहलीचं समर्थन
By admin | Published: March 22, 2017 08:27 AM2017-03-22T08:27:30+5:302017-03-22T09:20:18+5:30
विराट कोहली हा क्रिकेटमधील डोनाल्ड ट्रम्प आहे, असे एका लेखात म्हणत ऑस्ट्रेलियाच्या माध्यमाने पुन्हा एकदा वाद निर्माण केलाय. पण या प्रकरणात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोहलीला समर्थन दिलं आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हा क्रिकेटमधील डोनाल्ड ट्रम्प आहे, असे एका लेखात म्हणत ऑस्ट्रेलियाच्या माध्यमाने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. मात्र, या प्रकरणात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी कोहलीला समर्थन दिलं आहे.
'ऑस्ट्रेलियन मीडिया विराटला क्रीडाविश्वातील डोनाल्ड ट्रम्प असा उल्लेख करत आहे. त्याला विजेता आणि प्रेसिडेंट मानल्याबद्द आभार!', असे ट्विट करुन बिग बींना विराटला समर्थन दिलं आहे. भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत अनेकदा खेळाडूंमध्ये होणारी शाब्दिक वादावादी ठसनमध्ये बदलून जाते. बंगळुरू कसोटीमध्ये सुरू झालेल्या डीआरएसच्या खोटारडेपणाचा वाद काही थांबताना दिसत नाहीये. रांची कसोटीनंतर ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र 'द डेली टेलिग्राफ' ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची तुलना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी केली आहे. कोहली हा क्रिकेटमधील डोनाल्ड ट्रम्प असल्याचा उल्लेख एका लेखात करण्यात आला.
प्रतिस्पर्धी संघ आणि प्रतिस्पर्धी मीडियाला विराट कोहली नेहमीच जशास तसे प्रत्युत्तर देत असतो. ऑस्ट्रेलियन मीडियाच्या या वादग्रस्त लेखानंतर विराट कोहलीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. क्रीडा समीक्षक हर्षा भोगले, माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियाच्या मीडियावर टीका करत खंत व्यक्त केली आहे. 'द डेली टेलिग्राफ'च्या एका लेखामध्ये विराट कोहली जागतिक खेळातील डोनाल्ड ट्रम्प आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पप्रमाणे चुका दाखवल्यास विराट कोहली माध्यमांना दोष देतो.
यापूवीर्ही, 'द डेली टेलिग्राफ' ने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. दुस-या कोसाटीनंतर कोहलीला एलबीडब्ल्यू आऊट दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात अंपायरच्या रूममध्ये गेला आणि आउट का दिलं? याबाबत स्पष्टीकरण मागितलं, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या अधिका-यांवर स्पॉर्ट्स ड्रिंकची बाटली फेकली, त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, असा आरोप टेलीग्राफने केला आहे.
T 2471 - Aussi media calls Virat, Donald Trump of sports !! ... thank you Aussi media for accepting that he is a winner and the PRESIDENT !! pic.twitter.com/ZOoNtuhtC2
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 21, 2017