आमलाचे नाबाद शतक

By admin | Published: January 4, 2016 11:51 PM2016-01-04T23:51:23+5:302016-01-04T23:51:23+5:30

इंग्लंडच्या ६२९ धावांच्या धुवाधार खेळीला दक्षिण आफ्रिकेने संयमी फलंदाजीने प्रत्युत्तर देऊन तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ३५३ धावा उभारल्या.

Amla's unbeaten century | आमलाचे नाबाद शतक

आमलाचे नाबाद शतक

Next

केप टाऊन : इंग्लंडच्या ६२९ धावांच्या धुवाधार खेळीला दक्षिण आफ्रिकेने संयमी फलंदाजीने प्रत्युत्तर देऊन तिसऱ्या दिवसअखेर ३ बाद ३५३ धावा उभारल्या. हाशीम आमलाने ३७१ चेंडू टोलवून २१ चौकारांसह नाबाद १५७ धावा ठोकून दिवस गाजविला.
इंग्लंडने पहिल्या डावात केवळ ७५६ चेंडंूत ६ गड्यांच्या मोबदल्यात ६२९ धावांचा डोंगर उभारला. दीड दिवसात इंग्लंडच्या फलंदाजांनी जवळपास ५ धावगतीच्या सरासरीने ही धावसंख्या उभारली. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने ४३ षटकांत २ बाद १४१ धावा केल्या होत्या. एबी डिव्हिलियर्स (८८)सोबत आमलाने तिसऱ्या गड्यासाठी १८३ आणि फाफ डु प्लेसिससोबत (नाबाद ५१) चौथ्या गड्यासाठी आतापर्यंत ८५ धावांची भागीदारी केली. डिव्हिलियर्स २११ चेंडूंत १२ चौकार व एका षटकाराच्या साह्याने ८८ धावा करून तंबूत परतला. स्टीव्हन फिन याने जेम्स अँडरसनकरवी डिव्हीलियर्सला बाद केले. दोन बाद १४१वरून पुढे सुरुवात करणाऱ्या आफ्रिकेने दिवसभरात २१२ धावांची भार घातली व डिव्हिलियर्सचा बळी दिला. आमलाला आतापर्यंत दोनदा जीवदान मिळाले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड पहिला डाव : १२५.५ षटकांत ६ बाद ६२९ धावा, एडी हेल्स ६०, निक क्रॉम्पटन ४५, जो रुट ५०, बेन स्टोक्स २५८, जॉनी बेअरस्टो नाबाद १५०, मोइन अली नाबाद ०, १२५.५ षटकांत ६ बाद ६२९ (घोषित), कागिसो रबाडा ३/१७५, ख्रिस मॉरिस १/१५०, मोर्ने मोर्कल १/११४, साऊथ आफ्रिका पहिला डाव : १३० षटकांत ३ बाद ३५३, डीन एल्गर ४४, हाशीम आमला खेळत आहे १५७, एबी डिव्हिलियर्स ८८, फाफ डु प्लेसिस खेळत आहे ५१, बेन स्टोक्स १/५३, स्टीव्हन फिन १/६०.

Web Title: Amla's unbeaten century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.