दिव्यांग क्रीडा स्पर्धेत अमरावती, उस्मानाबाद, नागपूर संघ अजिंक्य
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 09:48 PM2019-02-04T21:48:08+5:302019-02-04T21:49:00+5:30
पाच खेळ प्रकारात पार पडली स्पर्धा
अमरावती : विभागीय क्रीडा संकुलात १ ते ३ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत अमरावती, उस्मानाबाद व नागपूर संघ अजिंक्य ठरले. स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी त्यांना गैरविण्यात आले.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय, क्रीडा संचालनालय आणि मासोदची सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्यावतीने येथील विभागीय क्रीडा संकुलावर तीन दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा पार पडली. यामध्ये पाच प्रकारातील दिव्यांग स्पर्धा झाल्यात. मतिमंद प्रवर्गात प्रथम क्रमांक अमरावती, द्वितीय पुणे, तृतीय उस्मानाबादने पटकाविला. मूकबधिर क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पुणे, द्वितीय जळगाव, तृतीय क्रमांक लातूरने पटकाविला.
अंध विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक अमरावती, द्वितीय अकोला व तृतीय क्रमांक पुणे संघाने मिळविले. अस्थिव्यंग क्रीडा प्रकारात प्रथम उस्मानाबाद, द्वितीय भंडारा, तृतीय क्रमांक नागपूर संघाने मिळविला. बहुदिव्यांग खेळ प्रकारात प्रथम क्रमांक नागपूर, द्वितीय बुलडाणा तर तृतीय क्रमांक नाशिक संघाने पटकाविला. स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाला आमदार बच्चू कडू, अपंग कल्याणचे आयुक्त बालाजी मंजुळे, क्रीडा शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक नैना कडू, संचालन ज्ञानेश्वर आमले, जितेंद्र ढोले यांनी, तर आभार प्रदर्शन राहुल म्हाला यांनी केले.