Maharashtra Kesari 2020 : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अमरावतीचे १५ मल्ल खेळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 07:53 PM2019-12-25T19:53:08+5:302019-12-25T19:53:58+5:30
Maharashtra Kesari 2020 : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा माती आणि गादी या प्रकारात होत असून, ७५ ते ६१ अशा आठ वयोगटात होणार आहे.
अमरावती : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्यावतीने केसरी कुस्ती स्पर्धा २०१९ पुणे येथील बालेवाडी स्टेडियमवर २ ते ७ जानेवारी दरम्यान आयोजित केली आहे. यामध्ये अमरावती येथील १५ पहिलवानांचा समावेश करण्यात आला असून, ते आझाद हिंद एक्स्प्रेसने १ जानेवारी रोजी पुण्याकडे रवाना होणार आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा माती आणि गादी या प्रकारात होत असून, ७५ ते ६१ अशा आठ वयोगटात होणार आहे. यात माती प्रकारामध्ये अमरावतीतील जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात सराव करणाºया १५ पहिलवानांना या स्पर्धेत खेळण्याची संधी उपलब्ध झाल्याची माहिती प्रशिक्षक जिेंद्र भुयार यांनी दिली. विक्की उके (५७ किलो वयोगट), अभिषेक मोडकर (६१), उमेश सुंदरकर (६५), प्रतीक यावले (७४), समीर देशमुख (७९), जितेंद्र डीके (८६), आदील पहिलवान (९७), कुणाल वाघ (१००) यांचा समावेश आहे. तसेच गादी कुस्ती प्रकारात शोएब पहिलवान (५७), गोविंद कपाटे (६१), जावेद पहिलवान (६५), नदीम खान (७९), राहुल बाखडे (८६), धर्मेंद्र डिके (९२), सय्यद शोएब (१००) यांचा समावेश आहे. हे सर्व पहिलवान व कोच रणविरसिंग राहल, मनोज तायडे हे १ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ६.२५ वाजता आझाद हिंद एक्स्प्रेसने बडनेराहून पुण्याकडे रवाना होणार असल्याची माहिती देण्यात आली.