आनंद बनसोडेने सर केला ज्वालामुखी माऊंट किलीमांजारो आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा, वाजविली राष्ट्रगीताची धून

By Admin | Published: August 16, 2014 10:24 PM2014-08-16T22:24:47+5:302014-08-16T22:24:47+5:30

सोलापूर :

Anand Bansode sar ki volcano mt Kilimanjaro flags to the highest peak in Africa, tricolor and foggy national anthem | आनंद बनसोडेने सर केला ज्वालामुखी माऊंट किलीमांजारो आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा, वाजविली राष्ट्रगीताची धून

आनंद बनसोडेने सर केला ज्वालामुखी माऊंट किलीमांजारो आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा, वाजविली राष्ट्रगीताची धून

googlenewsNext
लापूर :
सोलापूरचा एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेने वर्ल्ड पीस सेव्हन समिट मोहिमेंतर्गत स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो सर करून भारताचा तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला़ आनंदने सर्वोच्च शिखर सर केल्याचा आनंदोत्सव आपल्या गिटारद्वारे राष्ट्रगीताची धून वाजवून साजरा केला़
लिम्बा बुक, युनिक वर्ल्ड रेकॉर्डवीर आनंद बनसोडेने जगातील सात खंडातील सात शिखर सर करण्याची मोहीम आखली आह़े त्याअंतर्गत मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात माऊंट एव्हरेस्ट 2012 मध्ये त्याने सर करून दाखविल़े नुकतेच त्याने 2014 मध्ये युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट एल्ब्रुस सर केल़े त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी या मोहिमेचा तिसरा टप्पा पार करत आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो हा ज्वालामुखी शिखर सर करत एक नवा इतिहास रचला़
स्वातंत्र्यदिनी भारतीयांची मान अभिमानाने उंचावत सोलापूरच्या गिर्यारोहक आनंदने शिखरावर भारताच्या राष्ट्रगीताची धूनही आपल्या गिटारद्वारे वाजविली़ आनंदने ही मोहीम एकट्याने पूर्ण केली असून, या मोहिमेतून पर्यावरण बचावचा असा संदेश दिला आह़े
माऊट किलीमांजारोविषयी
आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो टांझानिया देशात आह़े याची उंची 19,340 फूट आह़े टांझानियाच्या उत्तरेला ज्वालामुखी पर्वत आह़े हा पर्वत तीन जिवंत ज्वालामुखींनी बनलेला आह़े त्यांची नावे कीबो (19,340), मेवान्झी (16,986), शिरा (13,000) अशी आहेत़ किलीमांजारो हा जगातील सर्वात मोठा फ्री स्टँडिंग प्रकारचा पर्वत आह़े
मोहिमेला आर्थिक पाठबळ
शाखा अभियंता राजेश जगताप यांच्या माध्यमातून संपर्कात आलेले मूळचे सोलापूरचे व पुणे-सोलापूरमधील अभियंता प्रमोद साठे यांनी आपल्या व्यंकटेश ग्रुपच्या माध्यमातून आनंदला या मोहिमेसाठी संपूर्ण प्रायोजकत्व दिले आह़े
आनंदचे शिक्षण:
आनंदने एम़एस्सी़ भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आह़े सध्या तो एनसीएल, पुणे येथे डॉ़ सतीश ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली रिसर्च प्रोजेक्ट करत आह़े
गिर्यारोहण, मोहिमेसाठी मार्गदर्शन:
आनंदला पुण्यातील सागरमाता शिक्षण संस्थेमार्फत गुरु सुरेंद्र शेळके यांच्याकडून मार्गदर्शन मिळत आह़े दिल्ली येथील मिशन आऊटडोअर या कंपनीने या मिशनचे आयोजन केले होत़े
पुढील मोहीम:
आनंद आपल्या पुढील मोहिमेत ऑस्ट्रेलिया खंडातील सर्वोच्च शिखर माऊंट कोस्कीझ्को सर करणार आह़े

Web Title: Anand Bansode sar ki volcano mt Kilimanjaro flags to the highest peak in Africa, tricolor and foggy national anthem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.