Anand Mahindra : मीराबाई चानूमुळे उद्योगपती आनंद महिंद्रा गहिवरले; म्हणाले, माझ्यासाठी ती आता गोल्ड मेडलिस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 10:00 PM2021-08-08T22:00:51+5:302021-08-08T22:01:27+5:30
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं ( Mirabai Chanu) ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले.
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत २६ वर्षीय मीराबाई चानू हिनं ( Mirabai Chanu) ४९ किलो वजनी गटात एकूण २०२ किलो ( ८७ +११५ किलो) वजन उचलून रौप्यपदक जिंकले. २०००च्या सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत कर्नाम मल्लेश्वरीनं कांस्यपदक जिंकले होते. त्यानंतर वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. मीराबाई हिनं तिच्या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. तिच्या खडतर काळात मदत करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचा मीराबाईनं सत्कार केला. हे ट्रक ड्रायव्हर चानूला तिच्या नोंगपोक काकचिंग गावामधील घरापासून खुमान लम्पक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथील प्रशिक्षण केंद्रापर्यंत रोज मोफत नेत असत. तिच्या या कृतीनं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रा यांना स्तब्ध केलं. मीराबाईच्या या कृतीचं कौतुक करणारे ट्विट करून आनंद महिंद्रा यांनी भावना व्यक्त केल्या. ( Anand Mahindra impressed Mirabai Chanu's That gesture)
आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या कुटुंबात मीराबाई चानूचा जन्म झाला अन् तिच्या प्रशिक्षणावर होणारा रोजचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. प्रशिक्षण केंद्र चानूच्या घरापासून ३० किलो मीटर दूर होते. तिथे जाण्यासाठी तिला १०-२० रुपये दिले जात होते, परंतु ते पुरेसे नसत. असा परिस्थितीत ती तिच्या घराजवळून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सकडे लिफ्ट मागत असे. त्यावेळी तिच्या मनात संकोच आणि भीती असे. मात्र धीर करून ती ट्रकमधून कोचिंग सेंटरमध्ये जात असे. काही दिवसांनंतर हे ट्रक ड्रायव्हरही तिला ओखळू लागले होते. तसेच तिचे घर जवळ येताच ते लांबूनच हॉर्न वाजवत असत. त्यामुळे चानूला वेळीच तयार होऊन ट्रकपर्यंत पोहोचता येत असे.
Olympiad @mirabai_chanu home was more than 25 km from the Sport Academy. No means of transport during those days, except trucks which carried river sands to the City. These truck drivers gave her lift everyday. Today she rewarded these truck drivers. pic.twitter.com/9WegUkwjkz
— Naorem Mohen (@laimacha) August 5, 2021
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून मीराबाई घरी परतली अन् तिनं सर्वप्रथम या ट्रक ड्रायव्हर्स व त्यांच्या साहाय्यकांचा सत्कार केला. त्याच ट्रक ड्रायव्हर्सना मीराबाईनं तिच्या घरी बोलावले अन् त्यांना टी शर्ट, मनीपूरी स्कार्फ आणि जेवायला दिलं. मीराबाईचे ही कृतज्ञता पाहून आनंद महिंद्रा भावूक झाले. ते म्हणाले,''मीराबाई चानूच्या या कृतीमुळे माझ्यासाठी ती सुवर्णपदक विजेती ठरली. तिला त्यांचे पाय पडताना पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले. आपल्या भारत देशातील ही सर्वात सुंदर भावनांपैकी एक आहे.''
As far as I’m concerned, this gesture of @mirabai_chanu makes her a Gold medallist. My eyes moistened seeing her touch their feet. One of the most graceful gestures in our country… pic.twitter.com/n84nvBTh3n
— anand mahindra (@anandmahindra) August 8, 2021