अनिदिंत रेड्डीचा दुहेरी विजय

By Admin | Published: October 9, 2016 04:41 AM2016-10-09T04:41:55+5:302016-10-09T04:41:55+5:30

हैदराबादचा अनिदिंत रेड्डी कोंडा याने राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी झालेल्या तिसऱ्या फेरीतील युरो जेके १६च्या दोन्ही शर्यती जिंकून या गटातील अजिंक्यपदाची

Anandi Reddy's double triumph | अनिदिंत रेड्डीचा दुहेरी विजय

अनिदिंत रेड्डीचा दुहेरी विजय

googlenewsNext

- विश्वास चरणकर, कोइमतूर
हैदराबादचा अनिदिंत रेड्डी कोंडा याने राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी झालेल्या तिसऱ्या फेरीतील युरो जेके १६च्या दोन्ही शर्यती जिंकून या गटातील अजिंक्यपदाची स्पर्धा आणखीनच चुरशीची बनविली. तर, एजीबी फॉर्म्युला ४ प्रकारात विष्णू प्रसादने आपली आघाडी कायम ठेवली.
जेके १६ची तिसरी फेरी सुरूहोण्यापूर्वी अनिदिंत ३८ गुणांसह चौथ्या क्रमांकावर होता. मात्र, त्याने शनिवारी दोन्ही स्पर्धा जिंकल्यामुळे त्याचे ५८ गुण झाले आहेत. त्याने आघाडीवर असलेल्या नयन चटर्जीबरोबरची आघाडी कमी केली आहे.
एलजीबी फॉर्म्युला ४ मध्ये मेको रेसिंगच्या विष्णू प्रसादने आपला दबदबा कायम ठेवला. त्याने १९ मिनिटे ५८.२७३ सेंकदांत ही शर्यत जिंकली. मागील ४ शर्यतींतील विष्णूचा हा तिसरा विजय आहे. त्याचे आता एकूण ४६ गुण झाले आहेत. त्याला दुसऱ्या क्रमांकावरील रंगासामीने चांगलीच लढत दिली. रंगासामीने १९ मिनिटे ५८.३०३ सेकंदांत ही शर्यत पूर्ण केली. त्याचे आता ३७ गुण झाले आहेत. या स्पर्धेत डार्क डॉन रेसिंगचा रोहित खन्ना याने तिसरा क्रमांक मिळविला.
जेके टुरिंग कप स्पर्धेत बंगळुरूच्या आशिष रामास्वामीने १४ मिनिटे १६.६०८ सेंकदांत ही स्पर्धा पूर्ण केली. याबरोबर त्याचे १०० गुण झाले आहेत. ग्रेटर नोएडा येथील बुद्ध सर्किटवर होणाऱ्या अंतिम फेरीपूर्वीच त्याने आपले विजेतेपद पक्के केले आहे. रामास्वामीचा हा सलग पाचवा विजय आहे. या शर्यतीत बंगळुरूचा दीपक पाल चिनप्पा दुसऱ्या, तर कोइमतूरचा विजयकुमार तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या गटात रामास्वामीला आव्हान देणारा राजाराम सी. सातव्या क्रमांकावर फेकला गेला. राजारामचे फक्त ५१ गुण झाले आहेत.

अनिदिंतने पहिली शर्यत १५ मिनिटे ४७.३१९ सेकंदांत, तर दुसरी शर्यत १७ मिनिटे २०.५१ सेकंदांत पूर्ण केली.
- कर्नाटकाचा अनंत षण्मुगम् दुसऱ्या, तर महाराष्ट्राचा मोहंमद नळवाला तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
- अनंतचे ६४ गुण झाले असून, तो नयन (६८ गुण)पेक्षा फक्त चारच गुणांनी मागे आहे.
- शनिवारच्या दोन्ही स्पर्धांत नयन चौथ्या क्रमांकावर राहिला.

Web Title: Anandi Reddy's double triumph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.