अनस अंतिम फेरीत

By admin | Published: July 8, 2017 01:30 AM2017-07-08T01:30:50+5:302017-07-08T01:30:50+5:30

२२व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन्सशीप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी यजमान भारताने चमकदार कामगिरी केली. राष्ट्रीय विक्रमवीर

Anas in the final round | अनस अंतिम फेरीत

अनस अंतिम फेरीत

Next

भुवनेश्वर : २२व्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियन्सशीप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी यजमान भारताने चमकदार कामगिरी केली. राष्ट्रीय विक्रमवीर मोहम्मद अनस याने पुरुष ४०० मी. शर्यतीमध्ये शानदार कामगिरीसह अंतिंम फेरीत धडक मारली. तसेच दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील (सॅग) सुवर्णपदक विजेती धावपटू जुआना मुरुमा हिने ४०० मी. अडथळा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. दरम्यान, सध्या २ सुवर्ण, एक रौप्य आणि ४ कांस्य अशा पदकांची कमाई करुन दुसऱ्या दिवसापर्यंत भारताने पदकतालिकेत अव्वल स्थान मिळवले होते.
कलिंग स्टेडियममध्ये दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरणात भारतीयांची कामगिरी बहरली. महिला धावपटू अर्पिता एम हिने ४०० मी. अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये छाप पाडताना अंतिम फेरी गाठली. अनु राघवन आणि जौना मुरमु यांनीही या प्रकाराची अंतिम फेरी गाठताना भारताच्या पदाकांची आशा वाढवली.
पुरुषांच्या ४०० मीटर उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये अनसने कमालीचे प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, गुरुवारी झालेल्या शर्यत जिंकून अनसने अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली होती. परंतु, यावेळी इतर संघांच्या खेळाडूंनी केलेल्या विरोधामुळे ही शर्यत पुन्हा खेळविण्यात आली.
रेफ्रीने चुकुन बंदुकीचा ट्रिगर दाबला. यानंतरही शर्यत सुरु राहिली, कारण कोणत्याही धावपटूने चुकीची सुरुवात केली नाही. मात्र, चुकीच्या ट्रिगरमुळे अ
ामची एकाग्रता भंग पावल्याचे सांगत इतर देशांच्या खेळाडूंनी ही शर्यत पुन्हा घेण्यास आयोजकांना भाग पाडले.
यानंतर पुन्हा झालेल्या उपांत्य फेरीमध्ये अनिसला बाजी मारताना थोडे झुंजावे लागले. इराणच्या अली खादिवारला काही शतांशच्या फरकाने मागे टाकत त्याने अंतिम फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)

चुकीमुळे भारताचा रिले संघ बाद

पुरुष रिले शर्यतीदरम्याने केलेल्या चुकीमुळे यजमान भारतीय संघाला चमकदार कामगिरीनंतरही स्पर्धेबाहेर पडावे लागले. संघातील एका सदस्याने आपल्या सहकाऱ्याकडून बॅटन घेताना बाजूची लाइन पार केल्याने भारतीय संघाला फटका बसला. जॉन अनुरुप, व्ही. के. ई. दासन, जे. देबनाथ आणि अमिय कुमार मलिक यांचा समावेश असलेला भारतीय संघ फोटो फिनिशमध्ये कोरियाच्या पुढे होता, मात्र खेळाडूंकडून झालेल्या चुकीमुळे नंतर संघाला बाद ठरविण्यात आले.

शर्यतीच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात भारतासाठी शर्यत सहज ठरली. परंतु, देबनाथ आणि मलिक यांच्यात बॅटन पास करताना गडबड झाली. दरम्यान, या शर्यतीमध्ये कोरियाने ४०.१८ सेकंदाची वेळ देत हीट जिंकली. दुसऱ्या हीटमध्ये चीनने बाजी मारली. चीनी तैपईने ३९.४० सेकंदाची, तर थायलंडने ३९.४८ सेकंदाची वेळ नोंदवली. दुसरीकडे, अनु राघवन, जौना मुरमु आणि एम. अर्पिता यांचा समावेश असलेल्या भारताच्या महिला रिले संघाने ४०० मीटर अडथळा शर्यतीसाठी पात्रता मिळवली.

भारताचा जगतार सिंग डोपिंगमध्ये दोषी

भुवनेश्वर : येथे सुरु असलेल्या आशियाई चॅम्पियन्सशीप अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा प्रमुख डेकाथलीट जगतार सिंग डोपिंग चाचणीमध्ये दोषी आढळल्याने खळबळ माजली. यामुळे भारताच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. पटियाला येथे राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) गेल्या महिन्यात घेतेलेल्या जगतारच्या युरिन ‘अ’ नमुना मेल्डोनियम चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळला. यामुळे त्याला आता अनिश्चित काळासाठी निलंबित करण्यात आले.

राजस्थानचा खेळाडू असलेल्या जगतारचा ‘ब’ नमुनाही दोषी आढळला, तर मात्र त्याच्यावर जास्तीत जास्त चार वर्षांपर्यंतची बंदी लागली जाऊ शकते. जगतारचा भारताच्या ९५ सदस्यीय संघामध्ये समावेश असून अभिषेक शेट्टीसह त्याला संघात स्थान मिळाले आहे.
गुरुवारी सुरु झालेल्या डेकाथलॉनमध्ये केवळ अभिषेकने सहभाग घेतला. ‘नाडा’ने चार दिवसांपुर्वीच याबाबत भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघटनेला सुचित केले होते. यानंतर जगतारला भारती़य संघाबाहेर करण्यात आले होते आणि त्यामुळे तो स्पर्धेठिकाणी पोहचू शकला नाही.
भारतीय संघाच्या एका पदाधिकाऱ्याए याबाबत सांगितले की, ‘स्पर्धा सुरु होण्याच्या तीन - चार दिवसांपुर्वीच डोपिंग चाचणीमध्ये जगतार दोषी आढळल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर आम्ही त्याला संघाबाहेर केले. तो भारतीय संघासोबत भुवनेश्वरला आला नाही.’ जगतारने फेडरेशन कप स्पर्धेत ६८८८ गुणांसह जेतेपद पटकावले होते. तसेच, शेट्टीने ६८१४ गुणांसह दुसरे स्थान पटकावले होते.

Web Title: Anas in the final round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.