...आणि मारिया भडकली
By admin | Published: June 21, 2016 08:04 PM2016-06-21T20:04:25+5:302016-06-21T20:16:08+5:30
जागतिक डोपिंगविरोधक एजसी (वाडा) चे प्रमुख क्रेग रिडी यांनी केलेल्या वक्तव्यावर टेनिस स्टार मारिया शारापोवा चांगलीच भडकली आहे. रिडी यांनी या वक्तव्यासंदर्भात माफी मागावी
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 21 - जागतिक डोपिंगविरोधक एजसी (वाडा) चे प्रमुख क्रेग रिडी यांनी केलेल्या वक्तव्यावर टेनिस स्टार मारिया शारापोवा चांगलीच भडकली आहे. रिडी यांनी या वक्तव्यासंदर्भात माफी मागावी, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली आहे.
डोपिंगच्या आरोपामुळे दोन वर्षांची बंदीची शिक्षा झेलणाऱ्या आणि पाच वेळा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या शारापोवाच्या वतीने तिचे वकील जॉन हॅगर्टी यांनी या संदर्भात रिडी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. रिडी यांनी सोमवारी शारापोवा हिची वार्षिक कमाई वाडापेक्षा अधिक असल्याचे वक्तव्य केले होते. शारापोवाच्या वकिलांनी रिडी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत वाडाने शारापोवाची माफी मागावी, अशी मागणी केली. मारिया शारापोवा हिच्यावर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने प्रतिबंध केलेल्या मेलोडोनियम पदार्थाचे सेवन केल्याच्या आरोपावरून मार्च महिन्यात दोन वर्षांची बंदीची शिक्षा ठोठावली आहे. गेल्या ११ वर्षांत सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंत शारापोवा आघाडीवर आहे. मात्र, डोपिंगमध्ये अडकल्यानंतर तिच्या कारकिर्दीला जणू ग्रहणच लागले आहे.