नरेंद्र मोदी हुकूमशहा नाहीत, तर...; अमित शाह यांच्या विधानावर टेनिस दिग्गज मार्टिना नव्हरातिलोव्हाची कमेंट अन् खवळले समर्थक!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 05:26 PM2021-10-11T17:26:48+5:302021-10-11T17:34:53+5:30
अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू मार्टिना नव्हरातिलोव्हा ( Martina Navaratilova) ही सध्या मोदी समर्थकांच्या निशाण्यावर आहे
अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू मार्टिना नव्हरातिलोव्हा ( Martina Navaratilova) ही सध्या मोदी समर्थकांच्या निशाण्यावर आहे. १० ऑक्टोबरला तिनं एक ट्विट केलं आणि त्यानंतर खूप मोठा वाद झाला. तिची ही कमेंट खेळासंदर्भात नव्हती, तर राजकिय आहे. मार्टिनानं भारताचे गृहमंत्री अमित शाह ( Amit Shah) यांच्या विधानाची फिरकी घेतली. त्यानंतर व्हायचं काय होतं, तिचं ट्विट व्हायरल झालं आणि समर्थकांनी तिला झोडून काढले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मुलाखत संसद टीव्हीवर प्रसारित करण्यात आली. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हुकूमशहा नाहीत, तर असे नेते आहेत की त्यांच्यासारखा लोकशाही नेता भारतात झालेला नाही. मोदी प्रत्येक निर्णय हे सर्वांशी सल्ला घेऊनच घेतात. अमित शाह यांचे हे विधान हिंदुस्थान टाईम्सनं प्रसारित केलं आणि त्यावर मार्टिनानं ट्विट केलं. तिनं म्हटलं, आणि हा माझा आणखी एक जोक.''
And for my next joke …😳🤡 https://t.co/vR7i5etQcv
— Martina Navratilova (@Martina) October 10, 2021
टेनिस कोर्टवर आक्रमक खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्टिनाचं हे ट्विट मोदी समर्थकांना आवडले नाही आणि त्यांनी तिच्यावर टीका केली.
चलो इसी बहाने इनके फॉलोवर बढ़ जाएंगे !!
— Sanket Pathak (@imsanketpathak) October 10, 2021
Bhakts pls leave Martina Hingis & Martina Trevisan alone.. they got nothing to do with this !
— IIIIIIIIIll (@_NairFYI) October 10, 2021
Martina Navratilova has mocked at Modiji, and now IT Cell is confused.
— PuNsTeR™ (@Pun_Starr) October 10, 2021
They can either boycott Navratri and drink Martini, or they can boycott Martini and continue Navratri.