..आणि शोएब अख्तरचा संयम सुटला
By admin | Published: March 20, 2016 11:55 AM2016-03-20T11:55:50+5:302016-03-20T11:57:37+5:30
विश्वचषक स्पर्धेच्या मंचावर भारताकडून सलग अकरावा पराभव झाल्यामुळे हताश झालेल्या शोएब अख्तरचा चॅनलच्या स्टुडिओमध्येच संयम सुटला.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - विश्वचषक स्पर्धेच्या मंचावर भारताकडून सलग अकरावा पराभव झाल्यामुळे हताश झालेल्या शोएब अख्तरचा चॅनलच्या स्टुडिओमध्येच संयम सुटला. कपिल देव यांना मध्यस्थी करुन अखेर शोएब अख्तरला शांत करावे लागले.
टी-२० विश्वचषक स्पर्धेचे समालोचन आणि विश्लेषणासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर भारतात आला आहे. शनिवारी रात्री सामना संपल्यानंतर स्टुडिओमध्ये चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी अँकर शोएबकडे पाहून हसला आणि शोएबचे पित्त खवळले.
तु असा का हसत आहेस ? असे संतप्त सवाल शोएबने अँकरला विचारला. स्टुडिओमधील वातावरण गरम झाल्याचे लक्षात येताच कपिलदेव मध्ये पडले. टीव्हीवर लागणा-या मौका, मौका जाहीरातीचे उदहारण देऊन स्टुडिओमधील अन्य पाहुण्यांनी शोएबला शांत करण्याचा प्रयत्न केला.
मला इथे सामन्याचे विश्लेषण करण्यासाठी बोलावले आहे. त्यामुळे त्या संदर्भातच आपण इथे बोलू, मस्करी करु नकोस असे शोएबने अँकरला बजावले.