आणि हा संघ झाला 28 धावांत गारद
By admin | Published: April 23, 2017 02:10 PM2017-04-23T14:10:26+5:302017-04-23T15:14:07+5:30
एकदिवसीय सामन्यात अकरा खेळाडू असतात. या अकरा खेळाडूंनी मिळून बनवल्या फक्त 28 धावा, त्यातही 13 धावा अवांतर होत्या.
ऑनलाइन लोकमत
थायलंड, दि. 23 - एकदिवसीय सामन्यात अकरा खेळाडू असतात. या अकरा खेळाडूंनी मिळून बनवल्या फक्त 28 धावा, त्यातही 13 धावा अवांतर होत्या. संघातील अकरा खेळाडूंना 100 धावाही बनवता न येणं म्हणजे हास्यपदच आहे. हे वाचून तुम्हालाही कदाचित विश्वास बसणार नाही. पण हा पराक्रम केला आहे चीनच्या संघाने. होय, आयसीसी वर्ल्ड लीगच्या पात्रता फेरीतील एका सामन्यात सौदी संघाविरोधात खेळणाऱ्या चीन संघाचा अक्षरशः धुव्वा उडाला. चीनचा अख्खा संघ अवघ्या 28 धावांत आटोपला. 50 षटकांच्या या सामन्यात चीनला सौदीविरोधात तब्बल 390 धावांनी पराभूत व्हावं लागले. सध्या थायलंडमध्ये आयसीसी वर्ल्ड लीग सुरू आहे. या स्पर्धेत यजमान थायलंडसह भूतान, बहारिन, कुवैत, कतार यांच्यासह सौदी आणि चीनच्या संघांनी सहभाग घेतला आहे.
थायलंड येथील चियांग माईतील जिमखाना क्लबमध्ये चीन आणि सौदी या दोन संघांत पात्रता फेरीतील सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना सौदीच्या संघाने 50 षटकांत 418 धावांचा डोंगर उभा केला. हे आव्हान घेऊन चीनचा संघ मैदानावर उतरला. मात्र, चीनच्या अख्ख्या संघाने 12.4 षटकांत अवघ्या 28 धावा करत लाजिरवाणा पराभव स्वीकारला. चीनच्या संघातील 7 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. इतर तीन फलंदाजांनी अनुक्रमे 3, 3 आणि नाबाद 6 धावा केल्या.
याआधी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2004 मध्ये श्रीलंकेच्या संघाने झिम्बॉम्बेच्या संघाचा 35 धावांमध्ये खुर्दा उडवला होता.
Scorecard from Division 1 of the WCL, where China have been bowled out for 28 in response to Saudi Arabia"s 418: https://t.co/6KPcKWrqmrpic.twitter.com/EgF5QPxsZb
— ICC (@ICC) April 22, 2017