अॅण्डरसन-जडेजा वादाची सुनावणी 1 ऑगस्ट रोजी

By admin | Published: July 23, 2014 03:33 AM2014-07-23T03:33:59+5:302014-07-23T03:33:59+5:30

जेम्स अॅण्डरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात झालेल्या वादाची सुनावणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियुक्त केलेले चौकशी आयुक्त गार्डन लुईस 1 ऑगस्ट रोजी करतील.

Andersen-Jadeja Hearing on August 1 | अॅण्डरसन-जडेजा वादाची सुनावणी 1 ऑगस्ट रोजी

अॅण्डरसन-जडेजा वादाची सुनावणी 1 ऑगस्ट रोजी

Next
लंडन : जेम्स अॅण्डरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यात झालेल्या वादाची सुनावणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियुक्त केलेले चौकशी आयुक्त गार्डन लुईस 1 ऑगस्ट रोजी करतील. त्यानंतर 48 तासांत ते निर्णय जाहीर करणार आहेत.
आयसीसीने मंगळवारी प्रारंभीच्या सुनावणीनंतर सांगितले, की 1 ऑगस्ट रोजी सुनावणी संपल्यानंतर आयुक्तांकडे आयसीसी आचारसंहितेच्या कलम 5.2 : 12 अंतर्गत निर्णय देण्यासाठी 48 तास असतील. 
गार्डन लुईस हे 1 ऑगस्ट रोजी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अॅण्डरसन याची चौकशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 (भारतीय वेळेनुसार दुपारी दीड) वाजता करतील. 
आयुक्तांपुढे मंगळवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी अॅण्डरसन 
तसेच ईसीबीचे प्रतिनिधी, त्यांचे वकील, आयसीसीच्या नैतिक आयोगाचे वकील, बीसीसीआयचे प्रतिनिधी आणि वकिलाने भाग घेतला. यामुळे 27 जुलैपासून सुरू होत असलेल्या तिस:या कसोटीत सहभागी होण्याचा अॅण्डरसनचा मार्ग मोकळा झाला आहे.  (वृत्तसंस्था)
 

 

Web Title: Andersen-Jadeja Hearing on August 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.