VIDEO:नीरज चोप्राचे स्वप्नभंग करून सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला लाथा बुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 02:08 PM2022-08-13T14:08:58+5:302022-08-13T14:11:43+5:30
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
नवी दिल्ली : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला (Neeraj Chopra) वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनमध्ये रौप्य पदकावर (Silver Medal) समाधान मानावे लागले होते. नीरजचे चॅम्पियन बनण्याचे स्वप्न भंग करणाऱ्या ग्रेनेडाच्या ॲंडरसन पीटर्सला (Anderson Peters) त्याच्याच देशात मारहाण झाली आहे. पीटर्स राष्ट्रकुल स्पर्धेत (CWG 2022) सहभागी झाला होता त्यामुळे याच आठवड्यात तो आपल्या मायदेशी परतला आहे. कॅरेबियन नॅशनल डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, पीटर्सवर काही लोकांनी जीवघेणा हल्ला केला आहे, ज्यामध्ये तो जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. या मारहाणीचा सर्व थरार कॅमेरात कैद झाला असून याची व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
ॲंडरसन पीटर्सने अलीकडेच अमेरिकेत पार पडलेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. त्याने तब्बल ९०.५४ मीटर भाला फेकून आपल्या पदकाचा बचाव केला होता. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणाऱ्या भारताच्यानीरज चोप्राने ८८.१३ मीटर भाला फेकून रौप्य पटकावले होते. मात्र ॲंडरसना त्याची ही सुवर्ण कामगिरी राष्ट्रकुल स्पर्धेत कायम ठेवता आली नव्हती. राष्ट्रकुल स्पर्धेत पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने ९०.१८ मीटर लांब भाला फेकून सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर पीटर्सला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.
#AndersonPeters being beaten by five non-national in #Grenadapic.twitter.com/NrVBJwu2t9
— Do.Biblical.Justice. (@StGeorgesDBJ) August 11, 2022
कॅरेबियन असोसिएशन ऑफ नॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष ब्रायन लुईस यांनी सांगितले, "मी शब्दांत सांगू शकत नाही की या घटनेमुळे मला किती वेदना झाल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ पाहून खूप दु:ख होत आहे."
पीटर्सला ग्रेनेडात झाली मारहाण
ज्या बोटीवर या मारहाणीची घटना घडली ती बोट त्रिनिदादच्या व्यापार मंत्र्यांच्या मुलाची आहे. या प्रकरणाची माहिती ग्रेनेडाच्या ऑलिम्पिक समितीने एक दिवस आधी अधिकृत निवेदनाद्वारे दिली होती. खेळाडूला मारहाण करणारे लोक ग्रेनेडातील नव्हते आणि पीटर्सला सुदैवाने जास्त दुखापत झाली नाही. सध्या आमची नजर पीटर्सच्या तब्येतीवर आहे. या प्रकरणाबाबत आम्ही सर्व पीटर्ससोबत आहोत आणि लवकरात लवकर त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी अधिक माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली होती.