अंधेरी वायएमसीएने विजेतेपद राखले
By admin | Published: June 21, 2015 12:57 AM2015-06-21T00:57:12+5:302015-06-21T00:57:12+5:30
गोरेगाव स्पोटर््स क्लबचा आणि राजस्थानचा दुसऱ्या क्रमांकाचा अव्वल खेळाडू पंकज विश्वकर्मा याच्या धडाक्यानंतरही गतविजेत्या अंधेरी
क्लब टेबल टनिस : महिला गटात मुलुंड जिमची बाजी
मुंबई : गोरेगाव स्पोटर््स क्लबचा आणि राजस्थानचा दुसऱ्या क्रमांकाचा अव्वल खेळाडू पंकज विश्वकर्मा याच्या धडाक्यानंतरही गतविजेत्या अंधेरी वायएमसीए संघाने नुकताच झालेल्या आंतरक्लब टेबल टेनिस लीग स्पर्धेत पुरुषांच्या प्रथम श्रेणीचे विजेतेपद राखले.
मुलुंड जिमखानाने सांताक्रूझ जिमखानाला नमवून महिला गटात बाजी मारली.
मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने खार जिमखाना येथे झालेल्या या स्पर्धेत पंकजने अंधेरीच्या एरिक फर्नांडिसचा ११-५, ११-९, १०-१२, ८-११, ११-६ असा पराभव करून गोरेगावला आघाडी मिळवून दिली. मात्र अमन बालगूने मंदार हर्डीकरचा ११-८, ११-७, १०-१२, ११-८ धुव्वा उडवून संघाला बरोबरी साधून दिली.
तर आदित्य महागावकरने परेश मुरेकरला ८-११, ८-११, ११-८, ११-३, ११-८ असे नमवताना संघाला आघाडीवर नेले. पुन्हा एकदा पंकजने अमनला ११-९, १२-१०, १२-१४, २-११, ११-५ असा धक्का देत सामना निर्णायक लढतीत नेला. एरिकने मंदारला नमवत संघाचे विजेतेपद निश्चित केले.
महिलांच्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात मुलुंड जिमने सांताकू्रझ जिमचे कडवे आव्हान ३-२ असे परतावून विजेतेपदावर नाव कोरले. दिव्या देशपांडेने पहिल्याच लढतीत प्रीती मोकाशीचा ११-९, ११-९, ११-७ असा फडशा पाडून सांताक्रूझला आघाडीवर नेले. यानंतर चार्वी कावळेने एकेरीमध्ये आणि त्यानंतर प्रीतीसोबत दुहेरीमध्ये बाजी मारताना मुलुंडला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
चार्वीने अक्षी संचेतीला ३-२
असे नमवल्यानंत दुहेरीमध्ये प्रीतीसोबत खेळताना दिव्या - अक्षी यांना ३-२ असे पराभूत केले. यानंतर दिव्याने चार्वीला ३-० असे
लोळवून सामना बरोबरीत आणला. तर निर्णायक पाचव्या लढतीत
प्रीतीने बाजी मारताना अक्षीचा ३-० असा धुव्वा उडवून संघाच्या विजेतेपदावर शिक्का मारला.
(क्रीडा प्रतिनिधी)