देशात Pickleball चा माहोल! Andre Agassi ला भारत दौऱ्याची उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 02:35 PM2024-10-28T14:35:02+5:302024-10-28T14:37:36+5:30

पिकलबॉलला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यासाठी सध्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. भारतही या खेळाला बूस्ट देण्यात मागे नाही.

Andre Agassi to visit India in January to promote pickleball | देशात Pickleball चा माहोल! Andre Agassi ला भारत दौऱ्याची उत्सुकता

देशात Pickleball चा माहोल! Andre Agassi ला भारत दौऱ्याची उत्सुकता

Andre Agassi to visit India in January to promote pickleball  : टेनिस जगतातील लोकप्रिय चेहरा आणि माजी वर्ल्ड नंबर  टेनिसपटू आंद्रे आगासी एका खास कारणासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. जानेवारीमध्ये  PWR DUPR इंडियन टूर आणि लीगचे उद्घाटन त्याच्या हस्ते होणार आहे. पिकलबॉलला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्यासाठी सध्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. या मोहिमेत आठ वेळचा ग्रँडस्लॅम विजेताही सहभागी झाला आहे. तो आता भारतात या खेळाचा प्रचार करताना दिसेल. 

भारत दौऱ्यासाठी उत्सुक आहे आंद्रे आगासी


भारतीय चाहत्यांसोबत पिकलबॉलचा उत्साह वाढवण्यासाठी उत्सुक असून मी पीडब्लूआर डीयूपीआर इंडियन टूर अँड लीगची आतुरतेने वाट पाहत आहे, असा संदेश आंद्रे आगासी याने  व्हिडिओच्या माध्यमातून दिला आहे. आंद्रे आगासी याने चार वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली असून दोन वेळा अमेरिकन ओपन तर फ्रेंच ओपनसह विम्बल्डन स्पर्धेत त्याने प्रत्येकी एक-एक वेळा जेतेपद पटकावले आहे. 

नुकती नवी दिल्लीत पार पडली पहिली वहिली पिकलबॉल स्पर्धा


जानेवारीत होणाऱ्या PWR DUPR इंडियन टूर आणि लीग स्पर्धेआधी  PWR DUPR इंडिया मास्टर्स चॅम्पियनशिप स्पर्धा नवी दिल्ली येथे पार पडली. २४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत रंगलेल्या स्पर्धेत देश विदेशातील खेळाडू सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. 'द बॅटल ऑफ द लीग' ही एक अनोखी टीम-आधारित स्पर्धा आहे जी प्रामुख्यानं हौशी खेळाडूंसाठी आहे. डायनॅमिक युनिव्हर्सल पिकलबॉल रेटिंग (डीयूपीआर), मायनर लीग पिकलबॉल, पिकलबॉल युनायटेड, फॅन्सप्ले, इंडियन पिकलबॉल असोसिएशन, आशियाई पिकलबॉल असोसिएशन आणि ग्लोबल पिकलबॉल फेडरेशन या वेगवेगळ्या पार्टनरच्या माध्यमातून या स्पर्धेच आयोजन करण्यात येत आहे.

अमेरिकेतील स्पर्धेसाठी पात्र ठरणारे खेळाडू होणार मालामाल

लीग स्पधेतील विजयी संघ यूएसए मधील DUPR नॅशनलमध्ये रंगणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतील  प्रवास आणि निवास खर्च PWR द्वारे करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील बक्षीसाची एकूण रक्कम ५० हजार अमेरिकन डॉलर इतकी असेल. त्यामुळे या स्पर्धेत पात्र होणाऱ्या खेळाडूंवर पैशांचा अक्षरश: पाऊस पडल्याचे पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Andre Agassi to visit India in January to promote pickleball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.