अ‍ॅण्डी मरेची विजयी घोडदौड!

By Admin | Published: September 3, 2016 12:47 AM2016-09-03T00:47:18+5:302016-09-03T00:47:18+5:30

जोरदार आवाजांमुळे होत असलेल्या अडचणींनंतरही जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा खेळाडू ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे याने तिसऱ्या फेरीत धडक मारली.

Andy Murraychi victorious! | अ‍ॅण्डी मरेची विजयी घोडदौड!

अ‍ॅण्डी मरेची विजयी घोडदौड!

googlenewsNext

न्यूयॉर्क : जोरदार आवाजांमुळे होत असलेल्या अडचणींनंतरही जागतिक क्रमवारीतील द्वितीय क्रमांकाचा खेळाडू ब्रिटनचा अ‍ॅण्डी मरे याने तिसऱ्या फेरीत धडक मारली. त्याचवेळी महिला गटात बलाढ्य आणि संभाव्य विजेत्या अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने सहज विजय मिळवताना आगेकूच केली.
आर्थर एश स्टेडियमच्या अत्याधुनिक सरकत्या छताखाली खेळताना सलग दोन आॅलिम्पिक पदक पटकावण्याचा पराक्रम केलेल्या मरेने दिमाखात आगेकूच करताना स्पेनच्या मार्सेल ग्रैनोलर्सचा ६-४, ६-१, ६-४ असस धुव्वा उडवला. तर, महिला एकेरीतील अव्वल खेळाडू सेरेनाने घरच्या मैदानावर अपेक्षित कामगिरी करताना आपल्याच देशाच्या वानिया किंगला ६-३, ६-३ असे लोळवले.
विम्बल्डन चॅम्पियन मरेने जागतिक क्रमवारीत ४५व्या स्थानी असलेल्या मार्सेलविरुद्ध चांगला सराव करुन घेताना अनेकदा लांबलचक रॅलीज् खेळल्या. त्याचवेळी या सरकत्या छताच्या स्टेडियममध्ये खेळताना मरेला प्रेक्षकांच्या जोरदार आवाजाचाही सामना करावा लागला. २०१२ साली या स्पर्धेत बाजी मारलेला मरे चौथे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात आहे. पुढील फेरीत त्याच्यासमोर बिगरमानांकीत पाओलो लोरेंजीचे आव्हान असेल. दरम्यान, यावेळी पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाल्यानंतर स्टेडियमचे छत बंद करण्यात आले. मात्र यावेळी, प्रेक्षकांचा आवाज आणि त्यात छतावर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आवाज यामुळे टेनिसपटूंना त्रास झाला. यावेळी त्यांना चेंडूच्या टप्प्याचाही आवाज ऐकण्यास येत नव्हता. मात्र, संयमी खेळ करताना मरेने बाजी मारली.
(वृत्तसंस्था)

विलियम्स भगिनींचा धडाका!
सेरेनाने पहिल्यांदाच सरकत्या बंदिस्त छताखाली खेळताना आपल्याच देशाच्या वानियाचा केवळ ६५ मिनिटांमध्ये फडशा पाडला. यासह सेरेनाने यूएस ओपन स्पर्धेत आपला ८६वा विजय नोंदवला.
दरम्यान, सेरेनाने देखील या बंदीस्त स्टेडियममध्ये खेळताना अतिरीक्त आवाजामुळे खेळताना त्रास झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
अन्य सामन्यात सेरेनाचे मोठी बहीण व्हीनसनेही आपली विजयी कूच कायम ठेवताना जर्मनीच्या जुलिया जॉर्जिसला ६-२, ६-३ असे लोळवले.
लुसी साफारोवला मात्र पाचव्या मानांकीत रोमानियाच्या सिमोना हालेपविरुध्द ३-६, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. पोलंडच्या चौथ्या मानांकीत एग्निजस्का रदवांस्काने ब्रिटनच्या नाओमी ब्राडीला ७-६, ६-३ असे नमवून विजयी कूच केली.

पोत्राचा अनपेक्षित, तर निशिकोरीचा झुंजार विजय
अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोने
अनपेक्षित निकालाची नोंद करताना
अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सन याचे आव्हान ७-६, ६-३, ६-२ असे संपुष्टात आणले.
तर, जपानच्या केई निशिकोरीला आगेकूच करण्यासाठी चांगलेच झुंजावे लागले. चार सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात त्याने रशियाच्या कारेन काचानोव्हचा ६-४, ४-६, ६-४, ६-३ असा पाडाव केला.

Web Title: Andy Murraychi victorious!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.