युकीसमोर आता अँडी मरेचे ‘चॅलेंज’
By admin | Published: January 17, 2015 11:58 PM2015-01-17T23:58:17+5:302015-01-17T23:58:17+5:30
माजी ज्युनिअर आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन भारताच्या युकी भांबरीने आॅस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीचे आव्हान यशस्वीरीत्या पार करताना मुख्य फेरीत मजल मारली आहे़
मेलबोर्न : माजी ज्युनिअर आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन भारताच्या युकी भांबरीने आॅस्ट्रेलियन ओपनच्या पात्रता फेरीचे आव्हान यशस्वीरीत्या पार करताना मुख्य फेरीत मजल मारली आहे़ मुख्य फेरीच्या लढतीत या भारतीय खेळाडूला ब्रिटनचा
स्टार टेनिसपटू अँडी मरेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे़ जागतिक क्रमवारीत ३१४व्या स्थानावर असलेल्या युकीने स्पर्धेच्या पात्रता फेरीतील तिसऱ्या सामन्यात आक्रमक खेळ करताना १७९व्या क्रमांकावर असणाऱ्या अमेरिकेच्या चेस बुकाननला ६-३, ६-४ ने
धूळ चारताना थाटात
आॅस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये प्रवेश केला़
युकीने जबरदस्त खेळ करताना पहिला सेट २६ मिनिटांत आणि दुसरा सेट ४९ मिनिटांत आपल्या नावे करण्यात यश मिळविले़ भारतीय खेळाडूने पाचपैकी तीन ब्रेक गुणांची कमाई केली़ त्याने या सामन्यात १९ विनर्स आणि ५ एस लगावले़ बुकाननला २ पैकी एकाच ब्रेक गुणाची कमाई करता आली़ त्याने तब्बल २१ टाळता येणाऱ्या चुका केल्या़ त्यामुळेच त्याला पराभवाचा सामना करावा लागला़
२२ वर्षीय युकीला कारकिर्दीतील सर्वात मोठ्या मुकाबल्यात माजी विम्बल्डन चॅम्पियन आणि सहावे मानांकन प्राप्त अँडी मरेचा सामना करावा लागणार आहे़ भारताचा डेव्हिस चषक खेळाडू असलेल्या युकी २००९मध्ये येथे ज्युनिअर चॅम्पियन राहिला आहे़
स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारताच्या सोमदेव देववर्मन आणि रामकुमार रामनाथन यांनी आपले नशीब आजमावले होते; मात्र त्यांना पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला़ (वृत्तसंस्था)
मरेला उत्कृष्ट
कामगिरीची अपेक्षा
च्आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत कठीण
ड्रॉ मिळाला आहे़ तरीही या स्पर्धेत आपण सर्वोत्कृष्ट कामगिरी करू’, असे मत इंग्लंडचा अनुभवी खेळाडू अँडी मरे याने व्यक्त केले आहे़
च्मरेला फायनलपर्यंतच्या प्रवासात त्याला स्वीत्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर आणि स्पेनचा अव्वल टेनिसपटू राफेल नदाल यांच्याशी सामना करावा लागू शकतो़