अँडी मरेचा ‘एक नंबर’ धडाका
By Admin | Published: November 6, 2016 11:53 PM2016-11-06T23:53:43+5:302016-11-06T23:53:43+5:30
ब्रिटनचा स्टार टेनिसपटू आणि दोन वेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन अँडी मरे याने जागतिक पुरुष एकेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कब्जा केला.
नवी दिल्ली : ब्रिटनचा स्टार टेनिसपटू आणि दोन वेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन अँडी मरे याने जागतिक पुरुष एकेरीच्या क्रमवारीत अव्वल स्थानी कब्जा केला. विशेष म्हणजे तब्बल ४३ वर्षांनंतर अव्वल स्थानी येणारा पहिला ब्रिटिश खेळाडू म्हणून मरेने इतिहास रचला. १९७३पासून सुरू झालेल्या संगणकीय क्रमवारीनंतर पहिल्यांदाच ब्रिटिश खेळाडू अव्वल स्थानी आला आहे.
सध्या सुरू असलेल्या पॅरिस मास्टार्स स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कॅनडाचा प्रतिस्पर्धी मिलोस राओनिक याने दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर मरेने सहज अंतिम फेरी गाठली. त्याच वेळी याआधी सलग १२२ आठवडे अव्वल स्थानी कायम राहिलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविचला या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच क्रोएशियाच्या मारिन सिलिचविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.