अनिल बिलावाने मिळविला 'नवोदित मुंबई श्री'चा किताब
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 04:03 PM2018-12-02T16:03:39+5:302018-12-02T16:04:17+5:30
परळच्या अनिल बिलावाने 'नवोदित मुंबई श्री'चा किताब पटकावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
मुंबई : परळच्या अनिल बिलावाने 'नवोदित मुंबई श्री'चा किताब पटकावत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मुंबईच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेत शरीरसौष्ठवपटू सहभागी झाले होते. बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आाणि फिटनेस संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची नवोदित मुंबई श्री स्पर्धा गतवर्षीप्रमाणे यंदाही खुल्या मैदानात आयोजित करण्यात आली. 195 नवोदित शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या प्रत्येक गटात 30-35 स्पर्धकांनी आपली ताकद दाखवली.
प्रत्येक गटात कंपेरिझन
प्रत्येक गटात 30-35 खेळाडू असल्यामुळे आधी 10 खेळाडूंची आणि मग पाच खेळाडूंची निवड करण्यासाठी जजेसना आपले कसब पणाला लावायला लागले. प्रत्येक गटात एकाच ताकदीचे 4-5 खेळाडू असल्यामुळे गटविजेता निवडतानाही त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. प्रत्येक गटांमध्ये गटविजेत्यासाठी अव्वल दोन-तीन खेळाडूंमध्ये कंपेरिझनही करण्यात आली. इतक्या प्रचंड सहभागाच्या स्पर्धेतून गटविजेत्याची निवड करणे आमच्यासाठी फार आव्हानात्मक असल्याचे गुणलेखक सुनील शेगडे यांनी सांगितले.
अनिल बिलावासमोर सारे फिके
स्पर्धेचे सातही गट अत्यंत चुरशीचे झाले. मात्र जेतेपदासाठी जेव्हा हेमंत भंडारी, विपुल सावंत, रूपेश चव्हाण, मकरंद दहिबावकर, अनिल बिलावा, राजेश खाटीकमोट आणि विकास म्हापसेकर हे सातही खेळाडू उतरले तेव्हा 75 किलो वजनीगटाच्या गटविजेत्या अनिल बिलावासमोर सारेच फिके पडले. या नवोदित खेळाडूने साऱ्यांनाच आपल्या प्रेमात पाडले.
नवोदित मुंबई श्री 2018 चा निकाल
55 किलो वजनी गट : 1. हेमंत भंडारी, 2. नितेश कोळेकर, 3. संजय आंग्रे, 4. अक्षय साळुंखे, 5. प्रशांत सडेकर.
60 किलो : 1. विपुल सावंत, 2. महेश कांबळे, 3. सुमीत यादव, 4. राजेश निर्मल, 5. अजित पद्मन.
65 किलो : 1. रूपेश चव्हाण, 2. अभिषेक पाटील, 3. सलीम शेख, 4. निलेश कासले, 5. अजय पोळ.
70 किलो : 1. मकरंद दहिबावकर , 2. शेख कादर बादशाह, 3. सुनील गुरव, 4. कुशल सिंग, 5. उत्तम मांगले.
75 किलो : 1. अनिल बिलावा, 2. महमद हुसेन खान, 3. हेमंत कंचावडे, 4. चिलयुहुरशी आनंदसत, 5. अरम सिंग.
80 किलो : 1. राजेश खाटिकमोट, 2. शब्बीर शेख, 3. पवन सोमई, 4. तौसिफ अंसारी, 5. प्रतिक मोहिते.
80 किलोवरील : 1. विकास म्हापसेकर, 2. प्रतिक यादव, 3. अभिषेक माशेकर, 4. प्रशांत वाळुंज, 5. महेश सुवर्णा
उत्कृष्ट पोझर : महमद हुसेन खान
नवोदित मुंबई श्री : अनिल बिलावा