अनिल, ज्योती कांस्यपदकाचे मानकरी

By admin | Published: May 12, 2017 01:00 AM2017-05-12T01:00:06+5:302017-05-12T01:00:06+5:30

आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या अनिलकुमार आणि ज्योती यांनी दुसऱ्या दिवशी आज येथे आपआपल्या गटात कांस्यपदके

Anil, Jyoti bronze medalist | अनिल, ज्योती कांस्यपदकाचे मानकरी

अनिल, ज्योती कांस्यपदकाचे मानकरी

Next

नवी दिल्ली : आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या अनिलकुमार आणि ज्योती यांनी दुसऱ्या दिवशी आज येथे आपआपल्या गटात कांस्यपदके जिंकली. दुसरीकडे महिलांच्या ५३ कि.गटात रितूचे पदक जिंकण्याचे स्वप्न भंगले.
अनिलने ग्रीको रोमनच्या ८५ किलो गटात उज्बेकिस्तानच्या मुहम्मदाली शमसिदिनोव्हविरुध्द शानदार पुनरागमन करताना ७-६ असा विजय मिळवून कांस्यपदक पटकावले. महिला गटात ज्योतीला ७५ किलो वजन गटात सेमीफायनलमध्ये जपानच्या मसाको फुरुची हिच्याकडून हरल्यामुळे कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
दिवसभरात एकूण पाच सामने झाले, त्यापैकी भारताने दोन सामन्यात पदके मिळवली. ८५ किलो गटातील मल्ल अनिलकुमारलादेखील पराभव पत्कारावा लागला. त्याला जपानच्या अतसुशी मासुमोतो याने ७-0 असे पराभूत केले. परंतु तोसुध्दा फ्लेआॅफमध्ये पोहचण्यात यशस्वी झाला, कारण जपानी पैलवानाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते. उज्बेकस्तानच्या मुहम्मदाली शमसिदिनोव याच्याविरुध्दच्या लढतीत अनिल एका वेळेस १-६ असा पिछाडीवर होता. परंतु अनिलने प्रतिस्पर्ध्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका करुन घेत त्याला खाली पाडून दोन गुणांची कमाई केली. यानंतर २९ वर्षीय भारतीय मल्लाने मागे वळून न पाहता कांस्यपदकाला गवसणी घातली.
महिलांच्या ७५ किलो वजन गटात भारताच्या ज्योतिला जपानच्या फुरुचीकडून पराभूत व्हावे लागले, त्यानंतर तिला रेपाशाजमध्ये कोणी प्रतिस्पर्धी नसल्याने कांस्यपदक तिच्या गळ्यात पडले.
रितूने महिलांच्या ६३ किलो गटात कांस्यपदकासाठी चांगली लढत दिली परंतु शेवटी ती कोरियाच्या जिनयंगकडून पराभूत झाली. पुरुषांच्या ७१ किलो वजन गटात किर्गीस्तानच्या नुरगेजी असनगुलोवकडून पराभूत झाल्याने भारताच्या दीपकलाही कांस्यपदक जिंकता आले नाही. अन्य एक ग्रिको रोमन आणि महिला मल्ल ज्ञानेंद्र (५९) आणि ज्योती (७५) हे आज सकाळीच पराभूत होवून स्पर्धेतून बाहेर पडले.(वृत्तसंस्था)

Web Title: Anil, Jyoti bronze medalist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.