भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

By admin | Published: June 23, 2016 05:49 PM2016-06-23T17:49:45+5:302016-06-23T18:15:26+5:30

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेची निवड करण्यात आली आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या निवडसमितीने

Anil Kumble is the coach of the Indian team | भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, २३ - भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे याची निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेमध्ये हा निर्णय जाहीर केला. एका वर्षासाठी ही निवड करण्यात आली असून कुंबळे यांच्या सहाय्यासाठी असणारी सहकाऱ्यांची निवडही लवकरच जाहीर करण्यात येईल असे ठाकूर म्हणाले.

सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या निवड समितीने आज भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे याची निवड केली. 

गेल्यावर्षी झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेपासून भारतीय संघ प्रशिक्षकाशिवाय खेळत आहे. या दरम्यान रवी शास्त्री यांच्याकडे संघाच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ते संघाला मार्गदर्शन करत होते. टी-२० वर्ल्डकपनंतर त्यांचा करार संपला. त्यानंतर एक जूनला बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी जाहीरात दिली होता. दरम्यान, प्रशिक्षकपदासाठी एकूण ५७ अर्ज आले होते. यामध्ये संदीप पाटील,  वेंकटेश प्रसाद, रवी शास्त्री यांचा समावेश होता. 
 
अखेर आज सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस लक्ष्मण यांच्या निवड समितीने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षपदी कुंबळे याची निवड केली. 
 

अनिल कुंबळे यांची कारकिर्द

 - लेगस्पिनर असलेल्या कुंबळेने 132 कसोटी सामन्यांमध्ये 619 बळी घेतले असून मुथय्या मुरलीधरन व शेन वॉर्न यांच्या खालोखाल ही कामगिरी आहे.

- तर एकदिवसीय सामन्यांमध्ये कुंबळेने 171 सामन्यांमध्ये 337 गडी बाद केले आहेत.

- 1999मध्ये एका डावात 10 विकेट घेण्याचा पराक्रम कुंबळेच्या नावावर आहे.

 

Web Title: Anil Kumble is the coach of the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.