अनिल कुंबळे अत्यंत प्रेरणादायक : रोहित शर्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2016 07:16 PM2016-06-29T19:16:02+5:302016-06-29T19:16:02+5:30
‘मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असल्यापासून दोन वर्षांसाठी अनिल कुंबळे यांची साथ मिळाली. मी संघाचा कर्णधार होतो आणि ते प्रशिक्षक तसेच मेंटॉर होते. कुंबळे खूप प्रेरणादायी आहेत
Next
>मुंबई : ‘‘मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असल्यापासून दोन वर्षांसाठी अनिल कुंबळे यांची साथ मिळाली. मी संघाचा कर्णधार होतो आणि ते प्रशिक्षक तसेच मेंटॉर होते. कुंबळे खूप प्रेरणादायी आहेत,’’ अशा शब्दांत भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा याने आपल्या नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याविषयी सांगितले.
मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये बोलताना रोहित म्हणाला, ‘‘कुंबळे निवृत्त होण्याआधी मला काहीकाळ त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. २००८ साली झालेल्या श्रीलंकेविरुध्दच्या कसोटी सामन्यात कुंबळेच्या नेतृत्त्वाखालील संघात माझा समावेश होता. त्यांनी ज्याप्रकारे क्रिकेट खेळले, ते खूप प्रेरणादायी आहे. ते लोकांना प्रेरीत करुन आव्हान स्वीकारण्यास तयार करतात.’’
त्याचप्रमाणे, ‘‘कुंबळे प्रशिक्षक व मेंटॉर म्हणून आपल्यासोबत कायम असतात. कधीही हार न मानण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे युवा खेळाडूंना त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची संधी मिळेल. ते अखेरच्या चेंडूपर्यंत लढतात आणि आपल्या खेळातूने कुंबळे हाच संदेश कायम देतात,’’ असेही रोहितने यावेळी सांगितले. (क्रीडा प्रतिनिधी)
..........................................
रवी शास्त्री यांनी संघाची जबाबदारी अशा वेळी सांभाळली जेव्हा संघ बिकट अवस्थेमध्ये होता. त्यांनी इतरांच्या तुलनेत वेगळा विचार करुन सर्वांनाच प्रभावित केले. शास्त्री यांच्या १८ महिन्यांच्या कार्यकाळाचा भारतीय क्रिकेटमध्ये खूप प्रभाव पडला. त्यांनी संघासह जुळल्यानंतर लगेच सकारात्मक प्रभाव टाकला.
- रोहित शर्मा