टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेचा अर्ज

By Admin | Published: June 14, 2016 10:14 AM2016-06-14T10:14:38+5:302016-06-14T10:14:38+5:30

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कर्णधार आणि आयसीसी क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेनेदेखील अर्ज केला आहे

Anil Kumble's application for Team India's coach | टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेचा अर्ज

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी अनिल कुंबळेचा अर्ज

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 14 - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी कर्णधार आणि आयसीसी क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेनेदेखील अर्ज केला आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरून 57 अर्ज आले असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अजय शिर्के यांनी दिली आहे. अनिल कुंबळेच्या नावावर 132 कसोटी सामन्यांत 619, तर 271 वन डे सामन्यांत 337 विकेट्स आहेत. शिवाय, आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि बंगलोरचा मेन्टॉर म्हणून त्याने जबाबदारी पार पाडली आहे. 
 
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज पाठविण्याची अंतिम मुदत १० जून होती. रवी शास्त्री यांनी संघाच्या प्रशिक्षकपदाची दीड वर्षे धुरा सांभाळली असून, तेदेखील इच्छुकांच्या यादीत आहेत. या शिवाय निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष संदीप पाटील, माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत, माजी सहप्रशिक्षक रॉबिन सिंग, विक्रम राठोड व बलविंदर सिंह संधू हेदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आहेत.
 
(प्रशिक्षकपदासाठी तब्बल ५७ अर्ज)
 
बोर्डाचे सचिव प्राप्त नावांतून योग्य व्यक्तींच्या नावांची प्रथामिक चाळणी करतील. त्यानंतर सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांची सल्लागार समिती प्रशिक्षकपदाच्या नावावर मोहोर उमटवितील. या महिन्यात होणाऱ्या कार्यकारी समितीच्या बैठकीत प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. 
झिम्बाब्वेच्या डंकन फ्लेचर यांच्यासोबतचा करार 2015 आयसीसी वर्ल्डकपनंतर संपला तेव्हापासून मुख्य प्रशिक्षकपदाची जागा रिक्त आहे.  
 
(टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी हिंदी आवश्यक)
 
बोर्डाने मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले असून, निवडीसाठी नऊ निकष ठेवले आहेत. यात प्रशिक्षकाकडे हिंदी भाषेत संवाद साधण्याचे कौशल्य हवे असेही म्हटले आहे तसेच प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणा-या उमेदवाराची कोणतीही वादाची पार्श्वभूमी नसावी असेही म्हटले आहे. 

Web Title: Anil Kumble's application for Team India's coach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.