अनिरुद्ध देशपांडे ठरला विजयी ‘राजा’

By admin | Published: July 24, 2016 12:48 AM2016-07-24T00:48:09+5:302016-07-24T00:48:09+5:30

अव्वल मानांकित अनिरुद्ध देशपांडे याने शानदार कामगिरी करीत ‘एव्हरी संडे रॅपिड चेस’ स्पर्धेच्या १४व्या सत्राचे विजेतेपद आपल्या नावे केले.

Anirudha Deshpande becomes victorious 'Raja' | अनिरुद्ध देशपांडे ठरला विजयी ‘राजा’

अनिरुद्ध देशपांडे ठरला विजयी ‘राजा’

Next

पुणे : अव्वल मानांकित अनिरुद्ध देशपांडे याने शानदार कामगिरी करीत ‘एव्हरी संडे रॅपिड चेस’ स्पर्धेच्या १४व्या सत्राचे विजेतेपद आपल्या नावे केले.
सिम्बायोसिसजवळील मंगलवाडी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ही स्पर्धा झाली. ७ फेरींच्या या स्पर्धेत अनिरुद्धने अपराजित राहण्याचा पराक्रम करताना ५ विजय आणि २ बरोबरीसह ६ गुण मिळवले. प्रत्येकी ५.५ गुण मिळवणारे शंतनू भांबुरे, गौरव हगवणे, संकर्ष शेळके अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे मानकरी ठरले. टायब्रेक गुणांत गौरव आणि संकर्षपेक्षा सरस ठरल्याने शंतनू उपविजेतेपदाचा मानकरी ठरला.
जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या या सत्रातील सहभागी खेळाडूंत तब्बल जण ३४ आंतरराष्ट्रीय मानांकनप्राप्त होते. अंतिम फेरीत अनिरुद्धला गौरव हगवणेविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. गतविजेता सिद्धांत ताम्हणकर गौरव झगडेकडून पराभूत झाला. संकर्षला हिमांशू छाब्राने बरोबरीत रोखले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय आर्बिटर राजेंद्र शिदोरे यांच्या हस्ते झाले. (क्रीडा प्रतिनिधी)

सातव्या फेरीचे
महत्त्वपूर्ण निकाल
अनिरुद्ध देशपांडे (६ गुण) बरोबरी वि. गौरव हगवणे (५.५). दिगंबर जाईल (५) बरोबरी वि. शंतनू भांबुरे (५.५). संकर्ष शेळके (५.५) विवि हिमांशू छाब्रा (४.५). रोहन जोशी (४.५) पराभूत वि. आकांक्षा हगवणे (५). गौरव झगेड (५) विवि सिद्धांत ताम्हणकर (४). अंजनेय फडके (५) विविकनाद आफळे (४). सोहम दातार (४.५) विवि मानस पंडित (४). आर. जी. नारगुंडकर (३.५) पराभूत वि. जयकुमार देसाई (४.५).

विविध वयोगटातील सर्वोत्तम खेळाडू
१० वर्षांखालील : नीरव किल्लेदार, शार्दुल गोडबोले, अर्णव देशपांडे.
१२ वर्षांखालील : दिगंबर जाईल, मानस पंडित, श्रावणी हलकुडे.
१४ वर्षांखालील : गौरव झगडे, आदित्य देशपांडे, मानसी ठाणेकर.
१६ वर्षांखालील : अंजनेय फडके, अद्वय साने, श्रावणी सरोदे.
सर्वोत्तम महिला खेळाडू : पर्णवी राणे.
सर्वोत्तम प्रौढ : आर. जी. नारगुंडकर.

Web Title: Anirudha Deshpande becomes victorious 'Raja'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.