कॉमेंट्री एन्जॉय करते : अंजुम
By admin | Published: May 11, 2015 02:36 AM2015-05-11T02:36:12+5:302015-05-11T02:36:12+5:30
आयपीएल-८ च्या कॉमेंट्री संघामध्ये सहभागी झालेली भारताची माजी महिला क्रिकेट कर्णधार अंजुम चोपडाला वाटते की, या खास संधीमुळे लोकांना निश्चितपणे महिला क्रिकेटबद्दल माहिती मिळेल.
नवी दिल्ली : आयपीएल-८ च्या कॉमेंट्री संघामध्ये सहभागी झालेली भारताची माजी महिला क्रिकेट कर्णधार अंजुम चोपडाला वाटते की, या खास संधीमुळे लोकांना निश्चितपणे महिला क्रिकेटबद्दल माहिती मिळेल आणि खेळांमध्ये होत असलेल्या पक्षपातीमध्ये नक्कीच सुधारणा होईल़ आयपीएल एक्स्ट्रा इनिंग्जमध्ये अनेकवेळा सहभागी झाल्यानंतर अंजुम आता इंग्लंडची माजी कर्णधार ईशा गुहा, आॅस्ट्रेलियाची अष्टपैलू लिसा स्थळेकर, आॅस्ट्रेलियाची क्रिकेटपटू मेलानी जोन्स यांच्यासह आयपीएल-८ च्या कॉमेंट्री संघाची सदस्य बनली आहे़ खेळातील धुरंधर आणि दिग्गज कॉमेंटरसोबत कॉमेंट्री करीत असलेल्या अंजुमने पीटीआयशी बोलताना म्हटले की, मला वाटते की कॉमेंट्रीच्या कामामुळे महिला आणि इतरांनादेखील क्रिकेट कॉमेंट्री करण्याचा मार्ग मोकळा होईल़ महिला क्रिकेटबाबत अशी तुलना केली जाते की, पुरुषांच्या क्रिकेटप्रमाणे इतके चांगले आणि सरस नसते़ अंजुम म्हणाली, मी तीन सत्रांमध्ये स्टुडिओमध्ये एक्स्ट्रा इनिंग्जची सदस्य राहिलेली आहे़ मात्र, कॉमेंट्रीचे अनुभव पूर्णत: निराळेच आहेत.एक क्रिकेटर म्हणून आयपीएलचे सदस्य होणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटर, कॉमेंटेटरसोबत काम करणे तथा क्रिकेट मैदानाजवळ असणे, मला वाटते की ही संधी दवडता कामा नये़ मी खूश आहे की, बीसीसीआयने मला काम करण्याची ही संधी दिली़