अंजूमची ‘खेलरत्न’, जसपालची द्रोणाचार्यसाठी शिफारस, नेमबाजी महासंघाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 01:46 AM2020-05-15T01:46:54+5:302020-05-15T01:48:25+5:30
२००८ ला नेमबाजी सुरू करणाºया चंदीगड येथील २६ वर्षांच्या मुदगिलने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे.
नवी दिल्ली : दिग्गज नेमबाज अंजूम मोगदिल हिच्या नावाची सर्वोच्या क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्नसाठी तसेच कोच जसपाल राणा याच्या नावाची सलग दुसऱ्यांदा द्रोणाचार्य पुरस्कारासाठी भारतीय राष्टÑीय रायफल संघटनेने(एनआरएआय) शिफारस केली आहे. अर्जुन पुरस्कारांसाठी पिस्तूल चॅम्पियन सौरभ चौधरी आणि अभिषेक वर्मा यांची नावे पाठविली आहेत.
महासंघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चारही नावे एकमताने पाठविली आहेत. जसपालला यंदा द्रोणाचार्य पुरस्कार मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. २००८ ला नेमबाजी सुरू करणाºया चंदीगड येथील २६ वर्षांच्या मुदगिलने दहा मीटर एअर रायफल प्रकारात विश्वचषकात रौप्य जिंकून टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे. मागच्यावर्षी अंजूम आणि दिव्यांश पंवार यांनी म्युनिच आणि बीजिंगमध्ये विश्वचषकात मिश्र सांघिक प्रकारात सुवर्ण जिंकले होते. खेलरत्न पुरस्कारापोटी पदक, प्रमाणपत्र आणि साडेसात लाख रुपये रोख रक्कम
दिली जाते.
मागच्यावर्षी ४३ वर्षांच्या जसपालची द्रोणाचार्यसाठी निवड न झाल्यावरून वाद उत्पन्न झाला होता. मनू भाकर, सौरभ चौधरी आणि अनीश भानवाला या खेळाडूंच्या जडणघडणीत जसपालची भूमिका मानली जाते. या पुरस्कारादाखल पाच लाखांची रोख मिळते. अभियंता, वकील आणि नंतर नेमबाज असा प्रवास करणारा ३० वर्षांचा वर्मा आॅलिम्पिक कोटा मिळविणारा भारताचा पाचवा खेळाडू आहे. १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मागच्यावर्षी ७ एप्रिल रोजी त्याने विश्वचषकात सुवर्ण जिंकून ही कामगिरी केली होती. १६ वर्षांच्या सौरभ चौधरी याने देखील विश्वचषकात विक्रमी कामगिरीसह सुवर्ण जिंकले शिवाय आॅलिम्पिकचे तिकीटही निश्चित केले होते. सौरभने विश्वचषकात आतापर्यंत दोन सुवर्ण जिंकली आहेत. (वृत्तसंस्था)