अंकुर, जीतूच्या कामगिरीवर नजर, विश्वकप नेमबाजी फायनल आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 04:29 AM2017-10-24T04:29:00+5:302017-10-24T04:29:06+5:30

नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली प्रथमच आयोजित आयएसएसएफ विश्वकप फायनल्स नेमबाजी स्पर्धेत फॉर्मात असलेला डबल ट्रॅप नेमबाज अंकुर मित्तल व पिस्तूल किंग जीतू राय यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे.

Ankur, Look at Jitu's performance, World Cup shooting finals from today | अंकुर, जीतूच्या कामगिरीवर नजर, विश्वकप नेमबाजी फायनल आजपासून

अंकुर, जीतूच्या कामगिरीवर नजर, विश्वकप नेमबाजी फायनल आजपासून

Next


नवी दिल्ली : भारताच्या यजमानपदाखाली प्रथमच आयोजित आयएसएसएफ विश्वकप फायनल्स नेमबाजी स्पर्धेत फॉर्मात असलेला डबल ट्रॅप नेमबाज अंकुर मित्तल व पिस्तूल किंग जीतू राय यांच्या कामगिरीवर नजर राहणार आहे. मंगळवारपासून या स्पर्धेला प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा म्हणजे नेमबाजीमध्ये भारताच्या वाढत्या प्रभावाची जाणीव करून देणारी आहे. या स्पर्धेत सहभागी होत असलेले भारताचे अव्वल नेमबाज आपली छाप सोडण्यास प्रयत्नशील आहेत.
कर्णीसिंग नेमबाजी रेंजमध्ये आयोजित या स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांना जगातील दिग्गज नेमबाजांकडून कडवे आव्हान मिळेल. भारतात प्रथमच या स्पर्धेचे आयोजन होत आहे. त्यात चार विश्वकप स्पर्धेतील सर्वोत्तम नेमबाज सहभागी होत आहेत.
गेल्या वर्षी रिओ आॅलिम्पिकच्या १५ स्पर्धांमधील ९ चॅम्पियन यात सहभागी होत आहे तर तीन माजी चॅम्पियन नेमबाजही यात दिसतील. या अकरा खेळाडूंमधील दोन (इजिप्तचा २१ वर्षीय एअर पिस्तूल चॅम्पियन अन्ना कोराकाकी व जर्मनीचा क्रिस्टियन रेइत्ज) पुन्हा एकदा सुवर्णपद पटकावण्याच्या निर्धाराने उतरणार आहेत. यजमान भारताचे एकूण १० नेमबाज ३ स्पर्धांमध्ये नशीब आजमावतील. त्यात जगातील अव्वल डबल ट्रॅप नेमबाज अंकुर मित्तल, जगातील माजी नंबर वन नेमबाज जीतू यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
>जीतू राय (१० मीटर पिस्तूल, ५० मीटर पिस्तूल, मिश्र टीम एअर पिस्तूल), अनप्रीत सिंग (५० मीटर पिस्तूल), पूजा घाटकर (१० मीटर एअर रायफल), रवी कुमार (१० मीटर एअर रायफल), अंकुर मित्तल (डबल ट्रॅप), शपथ भारद्वाज (डबल ट्रॅप), संग्राम दहिया (डबल ट्रॅप), हिना सिद्धू (मिश्र टीम एअर पिस्तूल), मेघना सज्जनार (मिश्र टीम एअर रायफल), दीपक कुमार (मिश्र टीम एअर रायफल).

Web Title: Ankur, Look at Jitu's performance, World Cup shooting finals from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.