आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिप नेमबाजीत अंकुर मित्तलला डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 04:06 AM2018-09-09T04:06:09+5:302018-09-09T04:06:13+5:30

भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने शनिवारी येथे आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले.

Ankur Mittal gets double trap in gold at the ISSF World Cup Championship | आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिप नेमबाजीत अंकुर मित्तलला डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण

आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिप नेमबाजीत अंकुर मित्तलला डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण

Next

चांगवोन : भारतीय नेमबाज अंकुर मित्तलने शनिवारी येथे आयएसएसएफ विश्वचॅम्पियनशिपच्या डबल ट्रॅप स्पर्धेत सुवर्णपदक पटकावताना कारकिर्दीतील सर्वात मोठे यश मिळवले.
स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. विश्वकपमध्ये अनेक पदके पटकावणाऱ्या या २६ वर्षीय नेमबाजाने १५० पैकी १४० नेम अचूक लगावले. त्यानंतर सुवर्णपदकासाठी शूटआॅफमध्ये त्याची लढत चीनच्या यियांग यांग व स्लोव्हाकियाच्या हुबर्ट आंद्रेजेजसोबत झाली. शूटआॅफमध्ये मित्तलने चीनच्या नेमबाजाचा ४-३ ने पराभव करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. आंद्रेजेजला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. अंकुरने त्यासोबत सांघिक स्पर्धेत मोहम्मद असाब व शार्दुल विहानच्या साथीने कांस्यपदक पटकावले. तिन्ही नेमबाजांनी एकूण ४०९ चा स्कोअर नोंदवला. सुवर्णपदकविजेत्या इटली संघाच्या तुलनेत हा स्कोअर दोनने कमी होता. चीनने ४१० च्या स्कोअरसह रौप्यपदक पटकावले.
दिवसातील अन्य स्पर्धांमध्ये दोन भारतीय महिला नेमबाज थोड्या फरकाने आपापल्या इव्हेंटमध्ये अंतिम फेरीसाठी अपात्र ठरल्या.
१० मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदकासह २०२० आॅलिम्पिक कोटा निश्चित करणारी अंजुम मुदगिल महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये पात्रता फेरीत ११७० च्या स्कोअरसह नवव्या स्थानी राहिली. अव्वल आठ नेमबाज अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्या. अंजुम आणि आठव्या स्थानावरील स्वित्झर्लंडची नीना क्रिस्टेन यांचा स्कोअर समान होता, पण नीनाने इनर १० चे ६६ नेम लगावले होते, तर अंजुमने ५६ ने इनर १० चे लगावले होते. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत मनू भाकर ५८४ अंकांसह पात्रता फेरीत १० व्या स्थानी राहिली. रॅपिड फायरच्या दुसºया पात्रता फेरीनंतर चार नेमबाज याच स्कोअरसह बरोबरीत होते, त्यात मनू व्यतिरिक्त सिंगापूरची शीऊ होंग तेह, कतारची अल्दाना साद अलमुबारक, आॅलिम्पिक व विश्व चॅम्पियन (१० मीटर पिस्तुल) अन्ना कोराक्की यांचा समावेश होता. शिऊ व अलमुबारक यांनी अनुक्रमे २२ व २१ इनर १० चा स्कोअर नोंदवित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली तर अन्ना व अंजुम यांचे अनुक्रमे १९ व १६ इनर १० होते.
ज्युनिअर मिश्र दुहेरी ट्रॅपमध्ये मनीषा किर आणि मानवादित्य सिंग राठोड यांनी पात्रता फेरीत १३९ च्या स्कोअरसह दुसरे स्थान पटकावित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळवली. फायनलमध्ये २४ अंकांसह त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. इटलीच्या ईरिका सेस्सा व लोरेंजो फरारी यांनी विक्रमी ४२ अंकांसह सुवर्णपदकाचा मान मिळवला.
स्पर्धेच्या सातव्या दिवशी भारताच्या खात्यात ७ सुवर्ण, ७ रौप्य आणि ६ कांस्यपदकांसह एकूण २० पदकांची नोंद आहे. भारत तालिकेत कोरिया व चीननंतर तिसºया स्थानी आहे. चीन दुसºया स्थानावर आहे.
भारताने विश्वचॅम्पियनशिपच्या माध्यमातून आॅलिम्पिकसाठी दोन कोटा स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Ankur Mittal gets double trap in gold at the ISSF World Cup Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.