राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : अंकुर स्पोर्ट्स क्लबला जेतेपद; सुशांत स्पर्धेत सर्वोत्तम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 01:49 PM2020-01-07T13:49:49+5:302020-01-07T13:50:12+5:30

अंकुर स्पोर्ट्स क्लबचा सुशांत साईल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

Ankur Sports Club win State level Kabaddi tournament | राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : अंकुर स्पोर्ट्स क्लबला जेतेपद; सुशांत स्पर्धेत सर्वोत्तम

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : अंकुर स्पोर्ट्स क्लबला जेतेपद; सुशांत स्पर्धेत सर्वोत्तम

googlenewsNext

मुंबई - अंकुर स्पोर्ट्स क्लबने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाने आपल्या “शतक महोत्सवी वर्षानिमित्त” आयोजित “पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे” अजिंक्यपद पटकाविले. अंकुर स्पोर्ट्स क्लबचा सुशांत साईल स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. लालबाग-मुंबई येथील सदगुरु भालचंद्र महाराज क्रीडांगणावर संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंकुर स्पोर्ट्स क्लबने चुरशीच्या लढतीत विजय क्लबचे आव्हान २८-२४ असे संपविले. 

विजयच्या अक्षय सोनीने पहिल्याच चढाईत गडी टिपत झोकात सुरुवात केली. त्याला प्रतिउत्तर देत अंकुरच्या सुशांत साईलने गडी टिपत १-१ अशी बरोबरी साधली. हा बरोबरीचा सिलसिला १०व्या मिनीतापर्यंत सुरू होता. त्यावेळे ६-६ अशी बरोबरी होती. मध्यांतराला मात्र १५-१३ अशी महत्वपूर्ण आघाडी घेण्यात अंकुरला यश मिळाले होते. ही आघाडी

मध्यांतरानंतर १४ मिनिटांपर्यंत टिकली. शेवटची ५मिनिटे पुकारली तेव्हा पुन्हा २२-२२ अशी बरोबरी साधण्यात विजय क्लब यशस्वी झाले. पण काही मिनिटातच अक्षय मिराशीने यशस्वी अव्वल पकड करीत अंकुरला पुन्हा दोन गुणांनी आघाडीवर नेले, तर अभिजित दोरुगडेने बोनससह एक गडी टिपत अंकुरच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सुशांत साईल, अभिजित दोरुगडे यांच्या पल्लेदार चढाया त्याला किसन बोटे, अक्षय मिराशीची मिळालेली पकडीची साथ या मुळे अंकुरला हा विजय मिळविता असला. अक्षय सोनी, अजिंक्य कापरे, विजय दिवेकर यांचा खेळ विजय क्लबला विजयी करण्यात कमी पडला. 

या अगोदर झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अंकुरने जॉली स्पोर्ट्सचा ३४-२९ असा, तर विजय क्लबने जय भारताला ३७-३६ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा खेळाडू म्हणून अंकुरचा अजिंक्य कापरे, तर उत्कृष्ट पकडीचा खेळाडू म्हणून अंकुर स्पोर्ट्सचा किसन बोटे हे ठरले.  

Web Title: Ankur Sports Club win State level Kabaddi tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.