वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय संघाची घोषणा, कुलदीप आणि ऋषभ पंतला संधी
By admin | Published: June 15, 2017 05:11 PM2017-06-15T17:11:56+5:302017-06-15T17:12:12+5:30
वेस्ट इंडिजविरोधात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एक टी-20 सामना खेळला जाणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - सध्या भारतीय संघ आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीचा उपांत्य सामना खेळत असून सर्वांच लक्ष या सामन्याकडे लागलं आहे. दरम्यान दुसरीकडे वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि एक टी-20 सामन्यासाठी या भारतीय संघाची घोषणा झाली आहे. कुलदीप यादव आणि ऋषभ पंत यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. याशिवाय प्रशिक्षकपदाची जबाबदारी अनिल कुंबळेच्याच खांद्यावर ठेवण्यात आली आहे.
23 जून रोजी मालिकेला सुरुवात होणार असून पहिला सामना त्रिनिनाद येथे होणार आहे. 25 जून रोजी होणारा दुसरा सामनाही त्रिनिनाद येथेच खेळवला जाणार आहे. यानंतर 30 जून रोजी तिसरा आणि 2 जुलै रोजी चौथा सामना खेळवला जाणार आहे. पाचवा आणि शेवटचा सामना 6 जुलै रोजी खेळला जाईल.
एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत एक टी-20 सामना भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान खेळवला जाईल. 18 जून रोजी चॅम्पिअन्स ट्रॉफीची फायनल होणार असून अशा परिस्थितीत भारतीय संघाला प्रॅक्टिस करण्याची संधी मिळणार नाही.
वेस्ट इंडिज दौ-यासाठी भारतीय क्रिकेट संघ -
विराट कोहली, शिखर धवन, रिषभ पंत, अजिंक्य रहाणे, धोनी, युवराज सिंग, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर अश्विन, आर जाडेजा, मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि दिनेश कार्तिक.