भारताच्या फुटबॉल संघाची घोषणा

By admin | Published: February 3, 2016 03:07 AM2016-02-03T03:07:07+5:302016-02-03T03:07:07+5:30

गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (सॅग) केवळ चार दिवस बाकी असताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) २८ खेळाडूंच्या संभावित भारतीय संघाची घोषणा केली

Announcement of India's football team | भारताच्या फुटबॉल संघाची घोषणा

भारताच्या फुटबॉल संघाची घोषणा

Next

नवी दिल्ली : गुवाहाटी येथे होणाऱ्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी (सॅग) केवळ चार दिवस बाकी असताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) २८ खेळाडूंच्या संभावित भारतीय संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे, ३१ जानेवारीपासून गुवाहाटी येथे सुरू झालेल्या सराव शिबिरामध्ये यापैकी २१ खेळाडू याआधीच सहभागी झाले आहेत. ‘अ’ गटात समावेश असलेल्या भारतापुढे गटात श्रीलंका व मालदीव यांचे आव्हान असेल. भारताचा सलामीचा सामना ६ फेब्रुवारीला श्रीलंकेविरुद्ध होईल. तर, यानंतर १० फेब्रुवारीला भारत मालदीवविरुद्ध दोन हात करेल.संभावित भारतीय संघ :
गोलरक्षक : अमरिंदरसिंग, रेहेनेश पराम्बा, कमलजितसिंग; बचावपटू : प्रीतम कोताल, संदेश झिंगन, नारायण दास, कौशिक सरकार, बिक्रमजितसिंग, अभिषेक दास, निखिल पुजारी, समद अली मलिक, प्रबीर दास, ऐबोरलांग खोंगजी; मध्यरक्षक : सुमीत पास्सी, जयेश राणे, प्रणय हलधर, आमोस टर, लालियाजुआला छांगटे, जर्मनप्रीतसिंग, माविमिंथांगा, जोडिंगलियाना, रोलिन बोर्गेस; आक्रमक : कालिचरण नरजारी, टी. हाओकीप, सलाम रंजनसिंग, विनीत राय, उदांतासिंग, जे. जे. लालपेखलुआ.

Web Title: Announcement of India's football team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.