अनुराग, रित्विज आघाडीवर

By Admin | Published: May 9, 2015 01:45 AM2015-05-09T01:45:09+5:302015-05-09T01:45:09+5:30

अखिल भारतीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा

Anurag, Ritz on the front | अनुराग, रित्विज आघाडीवर

अनुराग, रित्विज आघाडीवर

googlenewsNext
िल भारतीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा
पणजी : फोंडा तालुका बुद्धिबळ संघटना यांनी वागळे हायस्कूलच्या मदतीने आयोजित केलेल्या लक्ष्मीकांत व्ही. देसाई स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित अखिल भारतीय फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत गोव्याचा अव्वल मानांकित अनुराग म्हामल आणि रित्विज परब यांनी पाचव्या फेरीनंतर पाच गुणांसह आघाडी मिळवली आहे. स्पर्धेत त्यांनी आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. ही स्पर्धा मंगेशी येथील वागळे हायस्कूल येथे खेळविण्यात येत आहे.
स्पर्धेच पाचव्या फेरीनंतर दिल्लीचा सोनी क्रिश्नन, इयान सावियो रॉड्रिग्स, गौरव मडकईकर, अजय कुमार राय (दिल्ली), वैभव पेडणेकर आणि अर्जुन अडप्पा (कर्नाटक) हे ४.५ गुणांसह संयुक्तरित्या दुसर्‍या स्थानावर आहेत.ए. के. कलशायन, एम. बराथ, ओम बर्डे, राहुल पवार, राहुल व्ही. एस, गोपाल शाह, सुधाकर पटगार, अनिरुद्ध पार्सेकर, नंदिनी सारिपल्ली, दत्ता कांबळी, युती पटेल, सुनंद गोवेकर, आदिती प्रभुगावकर आणि मोहित खांडेपारकर हे संयुक्तरित्या तिसर्‍या आणि ४ थ्या क्रमांकावर आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)
पाचव्या फेरीनंतरचे निकाल : ए. के. कलशायन पराभूत वि. अनुराग म्हामल, रित्विज परब वि. वि. एम. बराथ, अजय कुमार राय बरोबरी वि. सोनी क्रिश्नन, वृषभ नाईक बरोबरी वि. अर्जुन अडप्पा, आकाश वागळे पराभूत वि. गौरव मडकईकर.

Web Title: Anurag, Ritz on the front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.