अनुराग ठाकूर बीसीसीआयचे नवे अध्यक्ष, अजय शिर्के सचिव
By admin | Published: May 22, 2016 10:18 AM2016-05-22T10:18:10+5:302016-05-22T11:51:07+5:30
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ठाकूर यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात होती.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ४१ वर्षीय ठाकूर बीसीसीआयचे सर्वात युवा अध्यक्ष ठरले आहेत. अजय शिर्के यांची सचिवपदी निवड करण्यात आली. ठाकूर यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात होती. रविवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीमध्ये त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सध्या सचिव म्हणून बीसीसीआयची धुरा सांभळत असलेले ठाकूर यांना पूर्व विभागाकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी मिळाली होती. या पदासाठी आता पूर्व विभागाचा क्रमांक आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी होते. विशेष म्हणजे, लोढा समितीच्या शिफारशींना लागू करण्याचा दबाव बीसीसीआयवर असताना ४१ वर्षीय ठाकूर या पदाचा कारभार सांभाळतील.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्षपदासाठी अनुराग ठाकूर यांचे नाव चर्चेत होते.
राजीनामा देताना काय म्हणाले शशांक मनोहर
काहीदिवसांपूर्वीच बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या शशांक मनोहर यांनी आपली आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘‘न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास मी असक्षम होतो आणि बीसीसीआयचा ढाचा कोसळताना मी पाहू शकत नाही.’’ असे धक्कादायक वक्तव्य केले.
आयसीसीचेपहिले स्वतंत्र चेअरमनपद झाल्यानंतर मनोहर यांनी सांगितले की ‘‘लोढा समितीच्या आधीही मी जे काही केले ते बोर्डच्या हितासाठी केले. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्यास मी सक्षम नाही. या बोर्डमध्ये माझ्याहून अनेक असे सक्षम व्यक्ती आहेत, जे या शिफारशी लागू करून घेऊ शकतात.