अनुराग ठाकूर करणार आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व

By admin | Published: September 22, 2016 05:42 AM2016-09-22T05:42:44+5:302016-09-22T05:42:44+5:30

अनुराग ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

Anurag Thakur represented in ICC | अनुराग ठाकूर करणार आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व

अनुराग ठाकूर करणार आयसीसीमध्ये प्रतिनिधित्व

Next


मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष अनुराग ठाकूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील. बुधवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या ८७व्या सर्वसाधारण वार्षिक सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे, मुंबई
क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांची आयसीसीमध्ये पर्यायी निर्देशक म्हणूनही निवड करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार, यावरून गेल्या काही दिवसांमध्ये अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. यामध्ये सर्वांत आघाडीवर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे नाव होते. आयसीसीमध्ये बीसीसीयाच्या प्रतिनिधित्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली जाऊ शकते, अशा चर्चांना उधाण आले होते; मात्र मुंबईत झालेल्या सभेमध्ये ही जबाबदारी ठाकूर यांच्याकडे सोपविण्याचा
निर्णय झाला.
त्याचवेळी आयसीसीचे चेअरमन आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या उपस्थितीमध्ये ठाकूर बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करणार आहेत. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये मोठे वादविवाद होत आहेत. त्याचवेळी आयसीसीमध्ये पर्यायी निर्देशक
म्हणून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचीही या वेळी निवड करण्यात आली. (क्रीडा प्रतिनिधी)
>शिर्के यांची बिनविरोध निवड...
बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांची पुन्हा एकदा बोर्डाच्या सचिवपदी बिनविरोधपणे निवड झाली. विशेष म्हणजे, या पदासाठी शिर्के यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीने अर्ज केला नसल्याने शिर्के यांच्या नावाची औपचारिक घोषणा मुंबईत झाली.
शशांक मनोहर यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर, तत्कालीन सचिव अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळले, तर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष शिर्के यांची सचिवपदी वर्णी लागली होती.
देवांग गांधी पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व करतील. त्यांनी चार कसोटी व तीन एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व
केले आहे.
जतीन परांजपे यांची पश्चिम विभागातून निवड झाली असून, त्यांनी भारताकडून चार एकदिवसीय सामने खेळले आहेत.
माजी आॅफस्पिनर सरनदीप सिंग उत्तर विभागाचे प्रतिनिधी आहेत.
नवनिर्वाचित निवड समितीकडे एकूण १३ कसोटी व ३१ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे.
भारताचे माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांना ज्युनियर निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.
>आयसीसीकडून शुभेच्छा...
न्यूझीलंडविरुद्ध गुरुवारी होणारा पहिला कसोटी सामना भारताचा ५०० वा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना असेल. यानिमित्ताने आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी भारतीय क्रिकेटचे अभिनंदन केले. मनोहर यांनी सांगितले, ‘५०० कसोटी सामने भारतीय क्रिकेटसाठी मोठे यश आहे.
भारत आयसीसीचा अत्यंत महत्त्वपूर्ण सदस्य असून, त्याचा इतिहास शानदार आहे. भारताने जागतिक दर्जाचे खेळाडू तयार केले. या ऐतिहासिक क्षणासाठी मी बीसीसीआयचे अभिनंदन करतो. तसेच, या क्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी दिलेल्या निमंत्रणासाठी मी बीसीसीआयचे आभार मानतो.’

Web Title: Anurag Thakur represented in ICC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.