अनुष्का पवार जागतिक शालेय जिमनॅस्टीक्ससाठी सज्ज

By Admin | Published: July 5, 2016 09:08 PM2016-07-05T21:08:58+5:302016-07-05T21:08:58+5:30

विलेपार्लेची राष्ट्रीय पदक विजेती अनुष्का पवारची आगामी जागतिक शालेय जिमनॅस्टीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

Anushka Pawar is ready for the World School Gymnastics | अनुष्का पवार जागतिक शालेय जिमनॅस्टीक्ससाठी सज्ज

अनुष्का पवार जागतिक शालेय जिमनॅस्टीक्ससाठी सज्ज

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ५ : विलेपार्लेची राष्ट्रीय पदक विजेती अनुष्का पवारची आगामी जागतिक शालेय जिमनॅस्टीक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा महासंघाच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा ट्रॅबझोन (तुर्कस्थान) येथे ११ ते १८ जुलै दरम्यान पार पडणार आहे.
तेलंगणा येथे नुकताच झालेल्या ६१ व्या राष्ट्रीय जिमनॅस्टीक स्पर्धेतून देशभरातील स्पर्धकांमधून जागतिक शालेय स्पर्धेसाठी भारताच्या जिमनॅस्टीक संघाची निवड करण्यात आली. या स्पर्धेत अनुष्काने थराराक कसरती करत उपस्थितांचे लक्ष वेधून भारतीय संघातील आपली जागा निश्चित केली.
विलेपार्ले येथील प्रबोधनकार क्रीडा संकुलात प्रशिक्षक हरीश परब यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असलेली अनुष्का अंधेरी येथील राजहंस विद्यालयात दहावीत शिकत आहे. 
 

Web Title: Anushka Pawar is ready for the World School Gymnastics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.