अराफत, तास्किनची गोलंदाजी शैली वैध
By admin | Published: September 24, 2016 05:31 AM2016-09-24T05:31:34+5:302016-09-24T05:31:34+5:30
बांगलादेशचे गोलंदाज अराफात सन्नी आणि तास्किन अहमद यांची गोलंदाजी अॅक्शन वैध असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे.
दुबई : बांगलादेशचे गोलंदाज अराफात सन्नी आणि तास्किन अहमद यांची गोलंदाजी अॅक्शन वैध असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. गोलंदाजी शैलीत सुधारणा आणि पुन्हा एकदा चाचणी केल्यावर त्यांची शैली वैध असल्याचे स्पष्ट केले आहे. हे दोन्ही खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करु शकतात.
त्याच्या शैलीची चाचणी ब्रिस्बेन येथील नॅशनल क्रिकेट सेंटरमध्ये करण्यात आली होती. त्यात दोघांचे मनगट १५ डिग्रीच्या आत वळतात. जे आयसीसीच्या नियमांनुसार आहे.
पंच भविष्यात या दोघांबाबत तक्रार करु शकतात. अराफत आणि तस्किन यांच्याबाबत आयसीसी विश्व २०-२० स्पर्धेत ९ मार्चला धर्मशाळात झालेल्या सामन्यादरम्यान तक्रार करण्यात आली होती.