Argentina in FIFA World Cup Final : 'या' सीक्रेट ड्रिंकचा चाहता आहे अर्जेंटिना संघ; अपल्या देशातून कतारला नेला मोठा साठा, अशी आहे खासियत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:36 PM2022-12-14T13:36:54+5:302022-12-14T13:42:06+5:30
अर्जेंटिनाच्या विजयात या हर्बल ड्रिंकचाही महत्त्वाचा वाटा आहे...!
नवी दिल्ली - अर्जेंटिना संघ फीफा वर्ल्ड कपच्या (Fifa World Cup 2022) फायनलमध्ये पोहोचला आहे. या टोर्नामेंटमध्ये अर्जेंटिनाने पहिल्या सेमीफायनलसामन्यात क्रोएशियाचा 3-0 ने पराभव केला होता. लियोनेल मेसीने एक तर ज्युलियन अल्वारेजने 2 गोल केले होते. हे यामुळेही महत्वाचे आहे, की मेस्सीला एक खेळाडू म्हणून अतापर्यंत वर्ल्डकपचा खिताब जिंकता आलेला नाही. या विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंसंदर्भातील अने गोष्टींनी लोकांचे लक्ष आकर्षित केले आहे.
अर्जेंटिनाच्या विजयात हर्बल ड्रिंकचाही महत्त्वाचा वाटा आहे. या ड्रिंकचे नाव आहे येरबा माटे. हे दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध ड्रिंक आहे. विशेष म्हणजे, अर्जेंटिनाचे खेळाडू तब्बल 1100 पौंड, म्हणजेच सुमारे 500 लिटर येरबा माटे घेऊन कतारला पोहोचले आहेत. आज फिफा वर्ल्डकपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये फ्रान्स आणि मोरोक्को यांच्यात सामना होणार असल्याची माहिती आहे. अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होईल.
न्युयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, दक्षिण अमेरिकेतील येरबा माटे या खास वनस्पतीच्या पानांपासून हे हर्बल ड्रिंक तयार केले जाते. हे ड्रिंक अर्जेंटिनाशिवाय ब्राझील, पराग्वे आणि उरुग्वेमध्येही प्रचंड प्रसिद्ध आहे. येथील सर्वच दिग्गज हे पेय घेतात. अर्जेंटिनाच्या नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ येरबा माटेचे अध्यक्ष जुआन जोस सिचोव्स्की यांनी म्हटले आहे, की येरबा माटेपासून काढा तयार करणे, ही एक कला आहे. हे आरोग्यसाठी अत्यंत चांगले आहे. तसेच यात पॉलीफेनोल असते, यात अँटीऑक्सीडेंटचे गूण असतात. खेळाडू हे रोज घेतात आणि हे त्यांच्या कल्चरमध्ये आहे.
कतारमध्ये मिळत नाही म्हणून सोबत नेले -
वर्ल्डकपसाठी येण्यापूर्वी हे पेय कतारमध्ये कसे उपलब्ध होईल, ही चिंता खेळाडूंना होती. यामुळे त्यांनी आपल्यासोबतच हे पेय आणले आहे. ब्राझीलचा संघ 26, तर उरुग्वेचा संघ 530 पौंड पेय घेऊन कतारला पोहोचला आहे. याशिवाय अर्जेंटिनाचा संघ जवळपास 1100 पौंड पेय घेऊन कतारला पोहोचला आहे. अर्जेंटिना संघात खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ, असे मिळून एकूण 75 लोक आहेत.
यासंदर्भात अर्जेंटिनाचा मिडफील्डर अॅलेक्सिस मॅक एलिस्टेरला विचारण्यात आले, की इतर संघातील खेळाडू ग्रीन टी घेतात, मग आपण येरबा माटे का घेता? यावर तो म्हणाला, यात कॅफीन असते. तरीही आम्ही, एकमेकांसोबत जोडलेले रहावे, यासाठी हे घेतो. महत्वाचे म्हणजे, अरेजंटिना संघ घेळाडूंना आवडणाऱ्या चवीनुसार, येरबा माटे घेऊन पोहोचला आहे, असे अर्जेंटिना संघाचे प्रवक्ते निकोल्स नोवेला यांनी म्हटले आहे.