FIFA World Cup 2022: नेदरलँड-अर्जेंटिना सामन्यात तुफान राडा, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच हणामारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 09:10 AM2022-12-10T09:10:49+5:302022-12-10T09:12:37+5:30

नेदरलँड आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान जबरदस्त राडा झाला. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. हा संपूर्ण प्रकार खेळाच्या 88व्या मिनिटाला घडला.

argentina vs netherland players fight in feisty FIFA World Cup Quarterfinal match leandro parades virgil van dijk football | FIFA World Cup 2022: नेदरलँड-अर्जेंटिना सामन्यात तुफान राडा, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच हणामारी

FIFA World Cup 2022: नेदरलँड-अर्जेंटिना सामन्यात तुफान राडा, दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये मैदानावरच हणामारी

Next

FIFA विश्वचषक 2022 मध्ये लिओन मेस्सीचा संघ असलेल्या अर्जेंटिनाची जबरदस्त कामगिरी सुरू आहे. शुक्रवारी (9 डिसेंबर) रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँड्सचा 4-3 अशा फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच आता  अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत धडक घेतली आहे. यानंतर, उपांत्य फेरीमध्ये त्यांचा सामना क्रोएशियाशीसोबत होईल. 

परेडेसने केली भांडणाची सुरुवात -
नेदरलँड आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान जबरदस्त राडा झाला. दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले. हा संपूर्ण प्रकार खेळाच्या 88व्या मिनिटाला घडला. तेव्हा अर्जेंटिनाचा संघ 2-1 ने आघाडीवर होता. अर्जेंटिनाचा मिडफिल्डर लिएंड्रो परेडेसने नॅथन एकेला टॅकल केले (जमिनीवर पाडले). यानंतर, रेफ्रीने फाऊलची शिट्टी वाजवली. यामुळे संतप्त झालेल्या परेडसने नेदरलँड्सच्या डगआऊटमध्ये बॉलला कीक मारली.

...डच खेळाडूने दिला धक्का - 
यावर नेदरलँडच्या खेळाडूंनीही प्रतिक्रिया दिली. ते परेडेसचा सामना करण्यासाठी लगेच मैदानावर गोळा झाले. डिफेंडर व्हर्जिल वॅन डिज्क धावत आला आणि त्याने परेडेसला धक्का दिला. यानंतर इतरही डच खेळाडूंनीही आपला राग व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मॅच रेफरींनी दोन्ही संखाच्या खेळाडूनचे भांडण सोडवले आणि त्यांना दूर केले. एवढेच नाही, तर परेडेस आणि Berghuis यांना रेफरींनी येल्लो कार्ड देखील दाखवले, जेनेकरून खेळ पुढे सुरू राहावा.
 

Web Title: argentina vs netherland players fight in feisty FIFA World Cup Quarterfinal match leandro parades virgil van dijk football

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.