अ‍ॅरॉन फिंचने रागाने फेकून दिलं हेल्मेट

By admin | Published: May 10, 2016 10:18 AM2016-05-10T10:18:04+5:302016-05-10T10:43:17+5:30

विजयामध्ये महत्वाची भुमिका बजावणा-या गुजरात लायन्सचा खेळाडू अॅरॉन फिंचने कोलकाताविरोधातील सामन्यात आऊट झाल्यानंतर राग व्यक्त करत हेल्मेट फेकून दिलं

Armon Finch throws a rage out of the helmet | अ‍ॅरॉन फिंचने रागाने फेकून दिलं हेल्मेट

अ‍ॅरॉन फिंचने रागाने फेकून दिलं हेल्मेट

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 10 - आयपील संघ गुजरात लायन्स आणि कोलकाता नाईट रायडर्समध्ये कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात गुजरातने सहज विजय मिळवला. मात्र गुजरातमधील एक खेळाडू मात्र अजितबात आनंदी नव्हता. विजयामध्ये महत्वाची भुमिका बजावणा-या अॅरॉन फिंचने आऊट झाल्यानंतर राग व्यक्त करत हेल्मेट फेकून दिलं. 
 
कोलकाताने गुजरातसमोर 159 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. गुजरातला जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज होती. रवींद्र जाडेजा स्ट्राईकला होता. 18 वी ओव्हर चालू होती. पियुष चावलाच्या ओव्हरचा चौथा बॉल खेळताना जाडेजाने मनीष पांडेकडे शॉर्ट मिड विकेटला शॉट मारला. नॉन स्ट्राईकला असणा-या फिंचने धाव घेतली, जाडेजाने फिंचला माघारी जाण्यास सांगितले तेव्हा फिंच अर्ध्या पीचवर पोहोचला होचा. पांडेने संधी साधत धावत जाऊन स्वत:च फिंचला रन आऊट केले. 
 
इतकी चांगली खेळी केल्यानंतर आणि जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज असताना अशाप्रकारे विकेट गेल्याने फिंचने नाराजी व्यक्त केली. यानंतर फिंचच्या रागाचा पारा चढला आणि त्याच रागात पॅव्हेलियनकडे गेला असता पोहोचल्यावर हेल्मेट फेकून आपला राग व्यक्त केला. मात्र सामना जिंकल्यानंतर फिंचने जाडेजासोबतचा फोटो अपलोड करुन पुन्हा मित्र झाल्याचं सांगितलं. फिंचने दमदार फटकेबाजी करत 3 चौकार आणि 2 षटकार मारत 10 चेंडूत 29 धावा केल्या. 
 
 
गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर दिनेश कार्तिकच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरात लायन्सने आयपीएलमधील सातवा विजय मिळवताना बलाढ्य कोलकाता नाइट रायडर्सला ५ गडी राखून नमवले. कोलकाताने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना गुजरातने १८ षटकांतच बाजी मारली. यासह गुजरातने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली.

Web Title: Armon Finch throws a rage out of the helmet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.