आर्या टाकोनेने रचला नवा उच्चांक! १ किमी धावली ६.१ मिनिटांत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 12:24 PM2021-06-20T12:24:28+5:302021-06-20T12:26:09+5:30

Arya Takone : मान्यवरांच्या हस्ते आर्याला पदक, मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Arya Takone sets new record! 1 km run in 6.1 minutes in wardha | आर्या टाकोनेने रचला नवा उच्चांक! १ किमी धावली ६.१ मिनिटांत

आर्या टाकोनेने रचला नवा उच्चांक! १ किमी धावली ६.१ मिनिटांत

Next

सेवाग्राम ( वर्धा)  : आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्ही मध्ये वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील आर्या पंकज स्नेहा टाकोने या चिमुकलीने १ किमीचे अंतर अवघ्या ६.१ मिनीटात पूर्ण करून नवा उच्चांक निर्माण केला आहे. ती ३ वर्षे चार महिन्यांची असून आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे.

वर्धेतील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापासून सकाळी सुरूवात करून सेंट एन्थोनी स्कूल येथे समारोप  झाला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.रामदास तडस, जि.प.च्या अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्ष वैशाली येरावार, महिला व बाल कल्याण सभापती रंजना पट्टेवार, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रविण माहिरे, नगराध्यक्ष अतुल तराळे,एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड चे परिक्षक व प्रतिनिधी डॉ.मनोज तत्ववादी,जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, बालरोगतज्ञ डॉ.शंतणू चव्हाण,सेंट एन्थोनी स्कूल चे प्राचार्य फादर सुबीन,व्यवस्थापक फादर विनसंट,सिस्टर जिमी तसेच आर्यासह वडिल पंकज व आई स्नेहा उपस्थित होते.

सुरूवातीला धावपटू फ्लाईंग सिख मिल्खा सिंग यांचे  निधन झाल्याने मौन श्रद्धांजली वाहण्यात आली. डॉ तत्ववादी यांनी रेकॉर्ड केलेल्या वेळेची घोषणा करून  सात व आठ मिनिटांत १ हजार मीटर धावण्याचे लक्ष होते. पण आर्याने मात्र दोन्ही रेकॉर्ड मोडीत काढून नवा रेकॉर्ड निर्माण केलेला आहे. तिचे कौतुक केले पाहिजे. आपल्या इथे टॅलेंट आहे.त्याला दिशा व संधी दिली पाहिजे.महिलांनी या कडे लक्ष द्या.आवडीच्या क्षेत्रात लक्ष गाठून रेकॉर्ड तयार करा.आम्ही मदत करायला तयार आहोत. आर्या सर्वांसाठी प्रोत्साहण व प्रेरणा आहे.प्रमाणपत्रावरून आर्या काय आहे हे सांगायची गरज नाही.१४० कोटी लोकसंख्येच्या देशात ती एकमेव आहे, असे सांगितले.

मान्यवरांच्या हस्ते आर्याला पदक, मोमेंटो आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मान्यवरांचे सूतमाळ व रोपटे देऊन स्वागत केले.तेरी है जमी ही प्रार्थना पूणम यांनी म्हटली.संचालन रीटा व तृप्ती यांनी केले तर सर्वांचे आभार पंकज टाकोने यांनी मानले. या प्रसंगी प्रोत्साहीत करण्यासाठी बाल खेळाडू, मैदानी स्पर्धक आणि तिच्या नावाचे टी शर्ट घालून उपस्थित होते.

Web Title: Arya Takone sets new record! 1 km run in 6.1 minutes in wardha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.