कसोटीपटू आशिष कपूरला डच्चू, राकेश पारिख कायम

By admin | Published: January 18, 2017 05:05 AM2017-01-18T05:05:55+5:302017-01-18T05:05:55+5:30

माजी कसोटीपटू आशिष कपूर याला डच्चू देत प्रथमश्रेणी क्रिकेटपटू राकेश पारिख याला कायम ठेवल्यामुळे संभ्रम वाढला आहे.

Ashish Kapoor dropped to Test player, Rakesh Parikh | कसोटीपटू आशिष कपूरला डच्चू, राकेश पारिख कायम

कसोटीपटू आशिष कपूरला डच्चू, राकेश पारिख कायम

Next


नवी दिल्ली : ज्युनियर निवड समितीतून माजी कसोटीपटू आशिष कपूर याला डच्चू देत प्रथमश्रेणी क्रिकेटपटू राकेश पारिख याला कायम ठेवल्यामुळे संभ्रम वाढला आहे. बङोदा क्रिकेट संघटनेचे कोषाध्यक्ष, संयुक्त सचिव आणि उपाध्यक्ष या पदांवर ११ वर्षे राहिल्याने पारिख लोढा समितीच्या शिफारशीनुसार अपात्र ठरतात. सिनियर आणि ज्युनियर निवड समितीत तीनच निवडकर्ते असतील, अशी लोढा समितीची अट आहे.
कसोटी क्रिकेट खेळले नसल्याने जतीन परांजपे आणि गगन खोडा यांना सिनियर निवड समितीतून डच्चू देण्यात आला होता. ज्युनियर निवड पॅनलवर निवडीसाठी ५० प्रथमश्रेणी सामने खेळण्याची अट होती. ही अट पाचही निवडकर्ते पूर्ण करीत होते. पारिख आणि अमित शर्मा हे कुठल्याही स्तरावर भारतातर्फे खेळलेले नाहीत. व्यंकटेश प्रसाद भारताकडून ३३ कसोटी आणि १०० वन-डे खेळले आहेत. कपूरने चार कसोटी आणि १७ वन डेत देशाचे प्रतिनिधित्व केले. ज्ञानेंद्र पांडे दोन वन डे खेळला आहे. निवडकर्त्यांना घरी पाठविण्याची वेळ येताच अमित शर्मासोबत कपूरलाही बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, बीसीसीआयचे महाव्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी पाठविलेल्या ई-मेलमध्ये २०१५ च्या आमसभेत निवडल्यानुसार कपूर आणि शर्मा हे निवडकर्ता म्हणून कायम असल्याचे म्हटले होते. व्यंकटेश प्रसाद, पारिख आणि ज्ञानेंद्र हे देखील कायम आहेत. पारिखला कायम ठेवण्यावर आता प्रश्नचिन्ह लागले आहे.
पारिख म्हणाले, ‘प्रशासनात माझा कार्यकाळ संपला आहे. मी ११ वर्षे पदावर होतो. मी २०१५ ला बीसीसीआयचा राजीनामा दिला. त्यानंतर निवडकर्ता बनलो. मला का कायम ठेवण्यात आले, यावर प्रतिक्रिया देणार नाही.’
पारिख यांना कायम ठेवल्याबद्दल वाद उद्भवताच एक ज्येष्ठ पदाधिकारी म्हणाला, ‘लोढा समितीच्या शिफारशी बघता अपात्र सदस्य कुठल्याही समितीत काम करू शकत नाही. पारिख यांना कसे घेतले, याचे आश्चर्य वाटते. ज्युनियर निवडकर्ता म्हणून पारिख यांची ही दुसरी टर्म आहे. २००६ ते २००८ हा त्यांचा पहिला कार्यकाळ होता. अशा वेळी त्यांना पदावरून हटविण्यात यावे.’
१९ वर्षे गटाच्या संभाव्य संघावर स्वाक्षरी करण्यास कपूर यांनी नकार दिल्याची चर्चा आहे. बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका न पटल्यामुळे ही कारवाई असावी, असे सूत्रांचे मत आहे.
६ जानेवारी रोजी लोढा समितीचे सचिव गोपाल शंकरनारायण यांचा निवडकर्त्यांना ई-मेल आला. त्यात दोन्ही संघ निवडण्याची परवानगी बहाल करण्यात आली. आशिष यांनी ई-मेलची प्रत मागितली. प्रत पाहताच त्यांनी निवड यादीवर स्वाक्षरी केली. सायंकाळी ७ वाजेपर्यंत विलंब लावल्यामुळे आशिष यांची कृती अवहेलना मानून बीसीसीआयने त्यांच्यावर सूड उगवल्याचे मानले जात आहे. कपूर यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही बोलणे होऊ शकले नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Ashish Kapoor dropped to Test player, Rakesh Parikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.