मुंबईकर तरुणाचा पराक्रम; अवघ्या एका मिनिटात मारले ४३४ स्ट्रेट पंच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 11:14 PM2021-03-22T23:14:29+5:302021-03-22T23:16:06+5:30

आशिषच्या विक्रमी कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया या संस्थेने घेतली असून या संस्थेचे सिनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांनी आशिषला प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविले.

ashish rajak hits 434 straight punches in just one minute | मुंबईकर तरुणाचा पराक्रम; अवघ्या एका मिनिटात मारले ४३४ स्ट्रेट पंच

मुंबईकर तरुणाचा पराक्रम; अवघ्या एका मिनिटात मारले ४३४ स्ट्रेट पंच

Next

मुंबई : बॉक्सिंग हा ताकद आणि बुद्धीचा खेळ. यात प्राविण्य मिळवण्यासाठी आयुष्याची कित्येक वर्षे खर्ची घालावी लागतात. त्यानंतरच एखादा खेळाडू यात पारंगत होतो. मात्र, कांदिवलीतील चाळीत राहणाऱ्या तरुणाने अवघ्या काही महिन्यांच्या सरावानंतर एका मिनिटात ४३४ स्ट्रेट पंच मारून बॉक्सिंगमध्ये विश्वविक्रम केला आहे. आशिष रजक असे या तरुणाचे नाव आहे.

आशिष हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर हे त्याचे मूळ गाव. सध्या कांदिवलीतील शिवनेरी चाळीत तो आई-वडिलांसोबत राहतो. घरात खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आशिषने हे यश मिळवले आहे. आशिषच्या या विक्रमी कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया या संस्थेने घेतली असून या संस्थेचे सिनियर एज्युकेटर संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांनी आशिषला प्रमाणपत्र आणि पदक देऊन गौरविले.

आपल्या विश्वविक्रमाबाबत ‘लोकमत’शी बोलताना त्याने सांगितले की, ‘लहानपणापासूनच मला काहीतरी जगावेगळे करण्याची इच्छा होती. पण काय करावे हे समजत नव्हते. मार्शल आर्टसमध्ये आवड निर्मान झाल्यानंतर ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रवेश घेतला. गेल्या ४ वर्षांपासून मी मार्शल आर्टस शिकत आहे. यादरम्यान प्रशिक्षक मनोज गौंड यांनी मला स्ट्रेट पंचवर भर देण्याची सूचना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मेहनत केली आणि यशाला गवसणी घातली.’

याआधीचा विक्रम
१८ वर्षांखालील गटाचा विचार करता याआधी एका मिनिटांत ३३४ स्ट्रेट पंच मारण्याच्या विक्रमाची गिनिज बूकमध्ये नोंद होती. मात्र, आशिषने एका मिनिटांत तब्बल ४३४ स्ट्रेट पंच मारत नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे. याविषयी त्याने सांगितले की,  ‘प्रशिक्षकांनी ४५० चे टार्गेट दिले होते. इतके पंच बसले असते. तर अन्य कोणी सहजासहजी हा विक्रम मोडू शकला नसता. मात्र, ४३४ पंचचा विक्रम मोडणेही एखाद्याला सहसा शक्य होणार नाही.’

माझ्या यशाचे श्रेय माझे आई-वडील आणि सर्व प्रशिक्षकांना जाते. लहानपणापासूनच जगावेगळे काहीतरी करण्याची इच्छा होती. कौतुकाचा वर्षाव होत असल्याने मेहनतीचे फळ मिळाल्याचे समाधान वाटते आहे.
-   आशिष रजक, विश्वविक्रमवीर   

Web Title: ashish rajak hits 434 straight punches in just one minute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.